RR vs RCB Live Updates : राजस्थानचा आरसीबीवर सात गड्यांनी विजय
RR vs RCB Live Updates, IPL 2022 Qualifier 2: राजस्थान आणि बेंगळुरुची रॉयल लढत, कुणाला मिळणार फायनलचं तिकीट?
LIVE
Background
RR vs RCB Live Updates, IPL 2022 Qualifier 2: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या संघातील सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलचा खिताॉब जिंकण्याचं स्वप्न इथेच संपणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. दोन्ही संघातील विजेता संघ थेट अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळण्यासाठी जाणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. त्यामुळे आजच्या या करो या मरोची परिस्थिती असणाऱ्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष्य लागून आह.
आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली असल्याने आज एक चुरशीचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतो.
कसा आहे पिच रिपोर्ट? -
आजचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडणार आहे. अहमदाबादचं वातावरण पाहता याठिकाणी उष्णता अधिक असू शकते. सायंकाळी 29 अंश सेल्सियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता असूनही खेळपट्टी पाहता चेंडूला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.
कधी आहे सामना? -
आज 27 मे रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना? -
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
राजस्थानचा आरसीबीवर सात गड्यांनी विजय
जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय.
जोस बटलरचं चौथं शतक
Dear Jos Buttler,
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 27, 2022
You are magic. This 100 was MAGIC. 💗
- Everyone
यंदाच्या हंगामात जोस बटलरच्या 800 धावा पूर्ण
8⃣0⃣0⃣+ runs for Jos this season.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 27, 2022
Unreal. Superhuman. Our own. 💗 pic.twitter.com/Lb6F8q0XZ2
पडिक्कल बाद
हेजलवूडने पडिक्कलला 9 धावांवर बाद केले
हसरंगाने केली चहलची बरोबरी
संजू सॅमसनला बाद करत हसरंगान चहलची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 26 विकेट जमा झाल्या आहेत...