रॉयल लढत, कोण मारणार बाजी? राजस्थानने नाणेफेक जिंकली, पाहा रॉयल्सची प्लेईंग 11
RR vs RCB, IPL 2022- Qualifier 2, Narendra Modi Stadium: करो या मरोच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
RR vs RCB, IPL 2022- Qualifier 2, Narendra Modi Stadium: करो या मरोच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. राजस्थान आणि आरसीबीच्या संघात कोणताही बदल कऱण्यात आलेला नाही.मागील सामन्यात संघ कायम ठेवलाय.
आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या संघातील सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलचा खिताॉब जिंकण्याचं स्वप्न इथेच संपणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. दोन्ही संघातील विजेता संघ थेट अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळण्यासाठी जाणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. त्यामुळे आजच्या या करो या मरोची परिस्थिती असणाऱ्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष्य लागून आह.
आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली असल्याने आज एक चुरशीचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतो.
राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals ) प्लेईंग 11 :
जोस बटलर, यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णधार), देवदत्त पडिकल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, ओबाय मकाय, प्रसिद्ध कृष्णा
आरसीबीची प्लेईंग 11 (Royal Challengers Bangalore) :
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीगार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), वानंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज
कुणाचं पारडं जड?
आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडणार आहे. अहमदाबादचं वातावरण पाहता याठिकाणी उष्णता अधिक असू शकते. सायंकाळी 29 अंश सेल्सियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता असूनही खेळपट्टी पाहता चेंडूला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.