एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Key Points : मुंबईचा 'रॉयल' विजय , सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

RR vs MI, Top 10 Key Points : सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने आपला पहिला विजय साकार केला. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...

RR vs MI, Top 10 Key Points : लागोपाठ आठ पराभवानंतर अखेर मुंबईने राजस्थानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला. राजस्थान रॉयलने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने आपला पहिला विजय साकार केला. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...(RR vs MI, Top 10 Key Points )

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने 35 व्या वाढदिवसाला नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  

मुंबईच्या संघात दोन बदल - 
मुंबईने राजस्थानविरोधात संघात दोन बदल केले. मुंबईने डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकट यांना वगळले. कुमार कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya Singh) आणि टीम डेविड यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ राजस्थानने कायम ठेवला. 

राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. देवदत्त पडिक्कल (15) याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयश आले. पडिक्कलनंतर कर्णधार संजू सॅमसनही माघारी परतला. संजू सॅमसनला फक्त 16 धावा करता आल्या.  

रविचंद्र अश्विन याने 9 चेंडूत 21 धावा करत राजस्थानची धावसंख्या वाढवली. अश्विन याने छोटेखानी खेळीदरम्यान एक षटकार आणि तीन चौकार लगावले. हेटमायरला फिनिशिंग टच देण्यात अपयश आले. हेटमायरने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत फक्त सहा धावांची खेळी केली.

मुंबईविरोधात बटलर पुन्हा चमकला - 
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात जोस बटलर याने शतकी खेळी केली होती. आजही बटलरने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. जोस बटलर याने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. जम बसल्यानंतर बटलरने धावांचा पाऊस पाडला. बटलरने 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चार षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला. जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 158  धावा केल्या.  

बुमराहची पाटी कोरीच - 
पदार्पण कऱणाऱ्या कुमार कार्तिकेयला एक विकेट मिळाली. त्याशिवाय डॅनिअल सॅम्सलाही एक विकेट मिळाली. हर्तिक शौकीनची गोलंदाजी महागडी ठरली. शौकीन याने चार षटकात 47 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. रायले मेरिडेथ याला दोन विकेट मिळाल्या. जसप्रीत बुमराहाची पाटी कोरीच राहिली. बुमराहाला एकही विकेट मिळाली नाही. जसप्रीत बुमराहने चार षटकात 27 धावा खर्च केल्या. 

लागोपाठ आठ पराभवानंतर अखेर मुंबईने राजस्थानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला. राजस्थान रॉयलने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने आपला पहिला विजय साकार केला. 

रोहित शर्मा आज पुन्हा अपयशी ठरला. अश्विनने रोहित शर्माला दोन धावांवर तंबूत धाडले. रोहितनंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची भागिदारी मोठी होईल, असे वाटत असतानाच ट्रेन्ट बोल्टने ईशान किशनला बाद केले. ईशान किशन 26 धावा काढून बाद झाला. ईशान किशनने 18 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 26 धावा जोडल्या.

ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला जोडीला घेत मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने 51 धावांची खेळी केली.   सूर्यकुमार यादवनंतर लगेच तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 56 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. 

टीम डेविड याने मोक्याच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत विजय मिळवून दिला.  टीम डेविडने 9 चेंडूत 20 धावांची खेळी केली. पोलार्ड पुन्हा एकदा फ्लॉप झाला, त्याने 14 चेंडूत 10 धावांची खेळी केली. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्र अश्विन आणि यजुवेंद्र चाहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget