(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RR vs DC Playing 11 : गुवाहाटीमध्ये राजस्थान आणि दिल्ली भिडणार, 'हे' 11 शिलेदार मैदानात उतरणार, खेळपट्टी कशी आहे?
RR vs PBKS, Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील अकरावा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानावर 8 एप्रिल रोजी दिल्ली विरुद्ध खेळवला जाणार आहे.
Rajasthan Royals vs Delhi Capitals : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात बुधवारी सामना रंगणार आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर गुवाहाटी 8 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील अकरावा सामना (IPL 2023 Match 11 ) खेळवला जाणार आहे. गुवाहाटीतील बरसापारा स्टेडिअमवर हा सामना पाहायला मिळणार आहे.
RR vs DC IPL 2023 : दिल्ली विरुद्ध राजस्थान लढत
दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएल 2023 मध्ये अद्यापही खातं उघडता आलेलं नाही. आयपीएलच्या 16 व्या मोसमात दिल्लीने दोन सामने खेळले असून त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघाने त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 72 धावांनी मोठा विजय मिळवला. नंतर, पंजाब किंग्सने (PBKS) विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला.
Barsapara Stadium Pitch Report : बरसापारा स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
बरसापारा स्टेडिअमची (Barsapara Stadium) खेळपट्टी (Pitch Report) मोठी धावसंख्या करणारी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. यावर सहज धावा होतात. फलंदाजाकडे ताकद आणि टायमिंग दोन्ही असेल आणि संयम असेल मोठे फटके मारता येतात. नाणेफेक हा देखील सामन्याचा महत्त्वाचा भाग असेल कारण अनेक संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास मदत होते.
RR vs DC Probable Playing XI : दिल्ली विरुद्ध राजस्थान संभाव्य प्लेईंग 11
RR Playing XI : राजस्थान संभाव्य प्लेईंग 11
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
DC Probable Playing XI : दिल्ली संभाव्य प्लेईंग 11
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, अमन हकीम खान, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :