IPL 2023 Points Table : लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल; गुजरातचे पहिले स्थान गेले, हैदराबाद तळाशी
IPL 2023 Points Table : लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
IPL 2023 Points Table : कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनराजयर्स हैदराबादचा पाच विकेटने पराभव केला. लखनौच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना 121 धावांपर्यंत रोखले, त्यानंतर फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले. लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. गुजरातला खाली खेचत लखनौने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. लखनौचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय होय. तर हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. एडन मार्करमचे नेतृत्वही हैदराबादला विजय मिळवून देऊ शकले नाही. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. पाहूयात गुणतालिकामध्ये कोण आघाडीवर... कोण तळाशी..
आघाडीचे चार संघ कोणते ?
हैदराबादचा पराभव करत राहुलच्या लखनौने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. लखनौने तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. चार गुणासह लखनौ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाचे आणि शिखर धवनच्या पंजाब संघाचेही चार - चार गुण आहेत. पण सरस नेट रनरेटच्या आधारावर लखनौ पहिल्या क्रमांकावर आहे, तर गुजरात दुसऱ्या आणि पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा दारुण पराभव करत कोलकाता संघाने चौथ्या स्थानावर कब्जा केला आहे.
हैदराबाद तळाशी -
हैदराबाद आणि दिल्ली या दोन्ही संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघाला अद्याप खाते उघडता आलेले नाही. दिल्लीचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादचा संघ दहाव्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स या यादीत नवव्या स्थानावर आहे. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
चेन्नई-आरसीबी कुठे ?
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ सहाव्या स्थानावर विराजमान आहे. चेन्नईला एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. फाफ डु प्लेसिसचा आरसीबी सातव्या स्थानावर आहे. आरसीबीनेही एका सामन्यात विजय मिळवलाय तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे, राजस्थानचे दोन सामन्यात दोन गुण आहेत.
IPL 2023 Points Table - a new Table Toppers. pic.twitter.com/iJzh3h8Lv5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2023
IPL 2023 : चीअर लीडर्सची कमाई ऐकाल तर हैराण व्हाल, सेलिब्रेटीही मागे पडतील
आयपीएलमध्ये पंचांना प्रत्येक सामन्याचे किती मानधन मिळते? रक्कम वाचून थक्क व्हाल