IPL 2022 : पाकिस्तानी परफ्यूमच्या दुकानावर काम करायचा आरसीबीचा स्टार गोलंदाज; शेअर केला किस्सा
Royal Challengers Bangalore: रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाकडे काही दमदार गोलंदाजांची फौज असल्याने त्यांचा खेळ अधिक चांगला होत असल्याचं मागील काही सीजनमध्ये दिसून आलं आहे.
IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) या क्रिकेटच्या भव्य स्पर्धेत अनेक युवा खेळाडू कमाल कामगिरी करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाचा मीडियम पेसर गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel). मागील काही हंगामात आरसीबीकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षलने त्याच्या आयुष्यातील एक अनोखा अनुभव शेअर केला आहे. हर्षलने एकेकाळी एका पाकिस्तानी व्यक्तीच्या परफ्युमच्या दुकानावर नोकरी केल्याचा अनुभव सांगितला आहे. हर्षलने गौरव कपूरच्या एका युट्यूब शोमध्ये हा किस्सा शेअर केला आहे.
'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात बोलताना हर्षल म्हणाला, ''मी न्यूजर्सी येथे राहायसला असताना एका पाकिस्तानी व्यक्तीच्या परफ्यूमच्या दुकानावर काम करायचो. मी गुजराती मीडियममध्ये शिकल्याने मला इंग्रजी येत नव्हती. त्यामुळे मी आधी इंग्रजी शिकलो. मी दररोज 12 ते 13 तास काम करायचो, तेव्हा जाऊन मला 35 डॉलर मिळत होते.'' दरम्यान हलाखीच्या काळात हर्षलने याप्रकारे काम करुन आज स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. हर्षलला अखेर 2014 मध्ये आरसीबीने 40 लाख रुपयांना खरेदी केलं. 2016 पर्यंत तो 40 लाख रुपयांवर संघाचा हिस्सा होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स त्नेयाला 20 लाख रुपयांत खरेदी केलं. पण 2020 ते 2021 पर्यंतच्या त्याच्या कामगिरीमुळे त्याला 2022 मध्ये चांगली हाईक मिळाली. त्याला आरसीबीने 2022 मध्ये 10.75 कोटींना विकत घेतलं.
हर्षलची मागील दोन हंगामात कमाल कामगिरी
मागील दोन हंगामात हर्षलने आरसीबी संघाकडून खेळताना अप्रतिम प्रदर्शन केलं आहे. त्याने मागील स्पर्धेत तर पर्पल कॅप देखील मिळवली होती. हर्षल पटेलने आजवर आयपीएलमध्ये 67 सामन्यात आतापर्यंत 84 विकेट्स घेतले आहेत. या दरम्यान एका सामन्यात 27 धावा देत 5 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. याशिवाय हर्षलने 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 11 विकेट्स देखील घेतल्या आहेत. मागील वर्षी त्याने 15 सामन्यात 32 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. यंदाही तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
हे देखील वाचा-