एक्स्प्लोर

Rohit Sharma: कोलकाताविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळला?; टी-20 विश्वचषकाआधी चिंता वाढवणारी बातमी

IPL 2024 MI vs KKR: कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील न केल्यानं विविध चर्चा रंगल्या होत्या.

IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात काल झालेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने 24 धावांनी मुंबईचा पराभव केला. या पराभवामुळे मुंबईचं यंदाच्या हंगामातील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकात्यानं दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 145 धावाच करता आल्या.

कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील न केल्यानं विविध चर्चा रंगल्या होत्या. यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला होता. रोहितने काल फक्त फलंदाजी केली. त्याने 12 चेंडूत 11 धावा केल्या.  इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रोहित मैदानात उतरल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास पुन्हा होऊ लागला आहे. याचकारणामुळे कोलकाताविरुद्ध तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला. आगामी टी-20 विश्वचषक असताना रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास होणं म्हणजे भारतीयांसाठी एक चिंतेची बाब आहे. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियुष चावलाने रोहित शर्माला होणाऱ्या पाठदुखीच्या त्रासाची माहिती दिली आहे. 

पियुष चावला नेमकं काय म्हणाला? 

सामना संपल्यानंतर बोलताना मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने रोहित शर्मा मुख्य प्लेइंग इलेव्हनमध्ये का नव्हता? त्याचा खुलासा केला. “रोहितला सौम्य पाठदुखीचा त्रास जाणवत होता. खबरदारी म्हणून त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही” असं चावला म्हणाला.

मुंबईचा पराभव-

केकेआरने पहिल्या खेळात 169 धावा केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने 70 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने 46 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा 11 धावा, इशान किशन 13 आणि नमन धीर 11 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 56 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले. 

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: (India Squad For ICC T-20 World Cup 2024)

रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद 

भारतीय संघाचे वेळापत्रक

5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 

संबंधित बातम्या:

आयपीएलनंतर टी-20 विश्वचषकाचा थरार; विजेता संघ होणार मालामाल, पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस

मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल

सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा काय बोलून गेला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget