एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्माच्या मनात नेमकं काय? व्हायरल व्हिडीओनंतर केकेआरच्या प्रशिक्षक ,खेळाडूंसोबत बैठक, वेगळं पाऊल टाकणार? 

Rohit Sharma : कोलकाता नाईट रायडर्सनं रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ डिलीट केला होता. आता रोहितचा आणि केकेआरच्या प्रशिक्षक, खेळाडूंसोबतचा फोटो समोर आला आहे.

Rohit Sharma Meeting With KKR Staff and Players कोलकाता : आयपीएलचं 17 वं पर्व मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आणि रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) निराशाजनक ठरलं आहे. रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करत नसून त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पार पडली. या मॅचपूर्वी रोहित शर्मा आणि अभिषेक नायरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. खरंतर तो व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्सनं पोस्ट केला होता. त्या व्हिडीओत रोहित शर्मानं केलेल्या वक्तव्यांची जोरदार चर्चा झाली. केकेआरनं काही वेळातच तो व्हिडीओ डिलीट केला होता. रोहित शर्मा पुढच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळावं अशी इच्छा पाकिस्तानचे माजी खेळाडू वासिम आक्रम यांनी व्यक्त केली होती. यावरुन चर्चा सुरु असतानाच रोहित शर्मा काल केकेआरच्या प्रशिक्षकांसोबत आणि खेळाडूंसोबत चर्चा करताना आढळून आला. या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 

नेमकं काय घडलं?

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचला पावसामुळं उशीर झाला होता. या दरम्यान रोहित शर्मा कोलकाता नाईट  रायडर्सच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत चर्चा करताना आढळून आला. साधारणपणे साडेसात वाजता सुरु होणारी मॅच सव्वा नऊ वाजता सुरु झाली. या दरम्यान रोहित शर्मा आणि केकेआरचे प्रशिक्षक, खेळाडू यांच्यात बैठक झाली त्यामध्ये सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि केएस भरत आणि मनिष पांडे हे केकेआरचे खेळाडू सोबत होते. 


कोलकाता नाईट रायडर्सनं अभिषेक नायर आणि रोहित शर्मा यांच्यासोबतचा एक व्हिडीओ डिलीट केल्यानंतर पुन्हा हा फोटो समोर आल्यानं चर्चांना उधाण आलंय. माजी क्रिकेटपटू वासिम आक्रम यांनी पुढील वर्ष  रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पाहायला मिळावं असं म्हटलं आहे. 

रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यामध्ये काय चर्चा?

कोलकाता आणि मुंबईची मॅच होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती."एक-एक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे, जे पण आहे ते माझे घर आहे भावा, ते मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे. भावा माझं काय, माझं तर हे शेवटचं", असं रोहित शर्मा म्हणत असल्याचा दावा करण्यात येतो.

संबंधित बातम्या : 

MI vs KKR : मुंबई आणि टीम इंडियाची काळजी वाढवणारी गोष्ट, रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याचा दाखला देत इरफान पठाण म्हणाला...

Video : सुनील नरेन यॉर्कर पाहत राहिला अन् दांड्या गुल, केकेआरचा हिरो जसप्रीत बुमराह पुढं ठरला झिरो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget