VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
Rohit Sharma Captaincy Against Punjab Kings : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा नऊ धावांनी पराभव (Mi vs PBKS) केला.
Rohit Sharma Captaincy Against Punjab Kings : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा नऊ धावांनी पराभव (Mi vs PBKS) केला. 193 धावांचा बचाव करताना मुंबईने पंजाबला 183 धावांत रोखलं. पण या विजयामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma Captaincy ) नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला. अखेरच्या चार ते पाच षटकांमध्ये आशुतोष शर्मानं पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पंजाब सामन्यात वरचढ झाल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik pandya Captaincy ) गांगरल्यासारखा झाला होता. पण त्याचवेळी अनुभवी रोहित शर्मा धावून आला. त्यानं अखेरच्या काही षटकांत मुंबईची सुत्रे (Rohit Sharma Take Charge in Last Over vs PBKS) हातात घेतली. गोलंदाजी बदल केले, फिल्डिंगमध्येही महत्वाचे बदल करत मुंबईला विजय मिळवून दिला. या विजयानंतर मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष (Mumbai Indians Celebration on Win vs PBKS) केला. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनीही जोरदार जल्लोष Hardik Pandya Hugs Rohit Sharma) केला.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Captaincy is an blood#Rohitsharmapic.twitter.com/mlQwKqxt8L
— cricparas45🦁❤️ (@cricketpar) April 19, 2024
अनुभवी रोहित शर्मा मुंबईसाठी पुन्हा एकदा धावून गेला. अखेरच्या षटकात त्यानं महत्वाचे निर्णय (Rohit Sharma Take Charge in Last Over vs PBKS) घेत पंजाबला रोखलं. मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली होती. 70 धावांमध्येच पंजाबने सहा विकेट गमावल्या होत्या. पण शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. खासकरुन आशुतोष शर्मा यानं अखेरच्या चार षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. आशुतोष शर्मा यानं झंझावती अर्धशतक ठोकले. यामध्ये सात षटकराचा समावेश होता. 12 चेंडू आणि 23 धावा असं समिकरण झालं, त्यावेळी रोहित शर्मा यानं चार्ज घेतला. गोलंदाजी बदल केले. फिल्डिंगही सेट केली. रोहित शर्माच्या अनुभवामुळेच मुंबईला विजय मिळवता आला. अखेरच्या षटकात रोहित शर्मानं चार्ज घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
Just look at hardik pandya expression who is captain 😂😭🤣#RohitSharma 🐐 pic.twitter.com/4JPos49xef
— Dr Rutvik Shrimali (@tmkoc_2008) April 19, 2024
Hardik Pandya was totally clueless in the last 5 overs. So he requested to Rohit Sharma to do captaincy.
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) April 19, 2024
Look at Hardik Pandya's face. 😂pic.twitter.com/mSfbPsKCKV
Just look at hardik pandya expression who is captain 😂😭🤣#RohitSharma 🐐 pic.twitter.com/4JPos49xef
— Dr Rutvik Shrimali (@tmkoc_2008) April 19, 2024
Hardik Pandya requested Rohit Sharma to set field in last over.
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) April 18, 2024
He knows only Rohit can win last over thrillers. 😂 pic.twitter.com/csq0SFo7HL
You can buy the captain but not the captaincy.
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) April 19, 2024
Leader Rohit Sharma won it yesterday for Mumbai Indians. pic.twitter.com/tGwWFPuC8z
आकाश मधवाल याला 20 षटक देण्यात आलं. त्याला महत्वाचा सल्ला देण्यासाठी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्माही आला होता. यावेळी रोहित शर्मानं त्याला महत्वाचा सल्ला दिला. बुमराहनेही आपला अनुभव पणाला लावला. पण हे सगळं सुरु असताना हार्दिक पांड्या फक्त पाहात राहिला होता. तो फक्त तिथं उपस्थित होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Thank God for Rohit Sharma and Jasprit Bumrah's existence! 🥺💓 pic.twitter.com/pjs3RlnWi6
— 🐐 (@ItsHitmanERA) April 19, 2024
आणखी वाचा :
सामन्यापेक्षा मैदानात उपस्थित असणाऱ्या मुलीचीच अधिक चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?