RCB Vs SRH: 'रन मशीन' विराट कोहली आणि 'श्रीनगर एक्स्प्रेस' उमरान मलिकचा फोटो व्हायरल
RCB Vs SRH: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयीपएलचा 36 वा सामना खेळण्यात आला. या
RCB Vs SRH: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद (Royal Challengers Bangalore Vs Sunrisers Hyderabad) यांच्यात आयीपएलचा 36 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात आरसीबीला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागलं. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादच्या संघानं आरसीबीला 68 धावांत ऑलआऊट करून अवघ्या 8 षटकात 9 विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर श्रीनगर एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं (Umran Malik) रन मशीन विराट कोहलीची (Virat Kohli) भेट घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. सनरायझर्स हैदराबादचा भाग असलेल्या या वेगवान गोलंदाजानं ताशी 150 किमी वेगानं गोलंदाजी केली आहे. टी-20 लीगच्या शेवटच्या हंगामात टी नटराजनला दुखापत झाल्यामुळं त्याच्याऐवजी उमरान मलिकला संधी दिली. या संधीचं त्यानं सोनं केलं. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून हैदराबादच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिटेन केलं.
ट्वीट-
उमरान मलिकची कारकिर्द
उमरान मलिकनं प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याला लिस्ट-ए मॅचमध्ये एक विकेट मिळाली आहे. त्यानं 15 टी-20 सामन्यांमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्यानं सात सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात त्याला भारतीय संघात स्थान मिळावं, अशी मागणी अनेक दिग्गज क्रिकेटपटू करत आहेत.
हैदराबादच्या संघाचं जोरदार कमबॅक
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक केलं आहे. हैदराबादच्या संघानं सलग पाच सामने जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आयपीएलदरम्यान आणखी एका क्रिकेटपटूचं निधन, क्रिकेट चाहत्यांना एकाच आठवड्यात दुसरा धक्का!
- IPL 2022: कोलकात्याविरुद्ध सामन्यात स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिकची पत्नी नताशा! पाहा व्हिडिओ
- LSG vs MI: अर्जून तेंडूलकर पदार्पण करणार? लखनौ- मुंबईची अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन