RCB vs KKR, IPL 2023 Live: कोलकात्याचा आरसीबीवर 21 धावांनी विजय
RCB vs KKR : लागोपाठ चार पराभवाचा सामना करणारा कोलकाता आणि विजयावर आरुढ असणारा आरसीबी यांच्यामध्ये आज लढत होणार आहे.
LIVE
Background
RCB vs KKR, IPL 2023 : लागोपाठ चार पराभवाचा सामना करणारा कोलकाता आणि विजयावर आरुढ असणारा आरसीबी यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. कोलकाताने घरच्या मैदानावर आरसीबीचा दारुण पराभव केला होता.. आरसीबी आता आपल्या घरच्या मैदानावर परभवाची परतफेड करणार का? दोन वेळा आयपीएल चषक उंचावणाऱ्या कोलकाता संघाला सात सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. कोलकाता संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. कोलकात्यासमोर आरसीबीचे तगडे आव्हान असणार आहे. अर्धा आयपीएल हंगाम संपत आला पण कोलकात्याला अद्याप प्लेईंग 11 मिळालेली नाही. प्रत्येक सामन्यात कोलकाता संघात नवीन खेळाडू दिसत आहेत. हेच कोलकात्यासमोर मोठं आव्हान असेल. दुसरीकडे आरसीबीची लोअर ऑर्डर फलंदाजी फ्लॉप होत आहे... मॅक्सवेल, फाफ आणि विराट कोहली या तीन खेळाडूंसोबतच आरसीबीची फलंदाजी आहे. इतर फलंदाजांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.
कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -
फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका कोलकाता संघाला बसला आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाकिब अल हसन या दोन अनुभवी खेळाडूंची कमी कोलकात्याला जाणवत आहे. चेन्नईविरोधात कोलकात्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नांगी टाकली. वेंकटेश अय्यर, नितीश राणा, एन जगदीशन, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.
कोलकात्याला अद्याप सलामी मिळाली नाही -
आयपीएलचा अर्धा हंगाम झाला आहे... पण कोलकात्याला अद्याप सलामी जोडी मिळालेली नाही. वेंकटेश अय्यर, सुनील नारायण, जगदीशन, लिटन दास, जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरबाज यांना सालमीसाठी वापरण्यात आले. पण एकाही फलंदालाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. चांगली सुरुवात न मिळणे... हे कोलकात्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय.
रसेलचा फ्लॉप शो -
आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. कोलकात्याने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला होता.. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. पण आता सामना आरसीबीच्या मैदानावर आहे. आरसीबीने तगड्या राजस्थानचा पराभव करत प्रतिस्पर्धी संघाला इशाराच दिलाय. विराट कोहली, फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल भन्नाट फॉर्मात आहेत.
आरसीबीपुढे काय आव्हाने -
फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने आतापर्यंत सात सामन्यात चार विजय मिळवले आहेत. आठ गुणांसह आरसीबी पाचव्या स्थानावर आहे. ग्लेन मॅक्सवेल, विराट आणि फाफ यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना अद्याप छाप सोडता आली नाही. दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर यांच्यासह इतर फलंदाजांची बॅट अद्याप शांत आहे. प्रमुख तीन फलंदाज लवकर बाद झाले तर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते.. हे प्रत्येक सामन्यात दिसून आलेय. मध्यक्रम फलंदाजांना जबाबदारी घेऊन धावा कराव्या लागणार आहेत.
सिराजला गोलंदाजांची चांगली साथ -
मोहम्मद सिराज करिअरच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. सिराज याने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सिराज याला पार्नेल, हर्षल पटेल आणि डेवि विली यांनी चांगली साथ दिली आहे. त्याशिवाय वानंदु हसरंगाही आता हळू हळू लयीत येताना दिसत आहे. वैशाक विजय कुमार धावांची लयलूट करतोय.. हे आरसीबीसमोर सर्वात मोठे आव्हान असेल. त्याशिवाय आज होणाऱ्या सामन्यात जोश हेलवूड खेळण्याची शक्यता आहे. असे झाले तर जगातील दोन आघाडीचे गोलंदाज आरसीबीची धुरा सांभाळतील...
हेड टू हेड काय स्थिती ? -
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. हा सामना कोलकात्याने जिंकला होता. पण आता बेंगलोरच्या मैदानावर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. यामध्ये कोलकाता संगाचे पारडे थोडे जड दिसतेय. कोलकाता संघाने आतापर्यंत 17 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबीने संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत.
M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल
आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होतो, असे आकडेवारीवरुन दिसतेय.
कोलकात्याचा आरसीबीवर 21 धावांनी विजय
कोलकात्याचा आरसीबीवर 21 धावांनी विजय
आरसीबीला आठवा धक्का, दिनेश कार्तिक बाद
आरसीबीला आठवा धक्का, दिनेश कार्तिक बाद
आरसीबीला सातवा धक्का
आरसीबीला सातवा धक्का, हसरंगा बाद
आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली बाद
आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली बाद झाला आहे. ३७ चेंडूत विराट कोहली ५४ धावांवर बाद झालाय.
आरसीबीला चौथा धक्का, लोमरोर बाद
आरसीबीला चौथा धक्का, लोमरोर बाद झाला.. १८ चेंडूत ३४ धावांची खेळी करत लोमरोर बाद झाला.. वरुण चक्रवर्तीने केले बाद