RCB Vs KKR LIVE: आरसीबीनं सामना जिंकला, कोलकात्याचा 3 विकेट्सनं पराभव
IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
LIVE

Background
आरसीबीनं सामना जिंकला, कोलकात्याचा 3 विकेट्सनं पराभव
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूनं कोलकात्याला 2 विकेट्सनं पराभूत केलंय.
RCB Vs KKR: कोलकात्याचा अर्धा संघ माघारी, सामना रोमांचक स्थितीत
आरसीबीविरुद्ध सामन्यात कोलकात्यानं 5 विकेट्स गमावली आहेत. कोलकात्याच्या संघाला विजयासाठी 16 बॉल 22 धावांची गरज आहे.
सुनील नारायणच्या गोलंदाजीवर डेव्हिड विली आऊट
कोलकात्यानं दिलेल्या 129 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाची छमछाक होताना दिसत आहे. अकरा षटकात आरसीबीनं 4 विकेट्स गमावून 63 धावा केल्या आहेत. विजयासाठी आरसीबीला 52 चेंडूत 65 धावांची गरज आहे.
IPL 2022: आरसीबीने 17 धावांत तीन विकेट गमावल्या, फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली बाद
कोलकातानं गोलंदाजी बदलून सुनील नारायणला गोलंदाजी दिली. नारायणनं या षटकात किफायतशीर गोलंदाजी केली आणि केवळ 4 धावा दिल्या. 7 षटकांनंतर आरसीबीचा स्कोअर 40/3
RCB Vs KKR, IPL 2022: कोलकात्याचं आरसीबीसमोर 129 धावांचं लक्ष्य
RCB Vs KKR, IPL 2022: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) डी वाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात कोलकात्यानं बंगळुरूसमोर (RCB Vs KKR) 129 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाताच्या संघानं आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. कोलकात्यानं 20 षटकात सर्वबाद 128 धावा केल्या आहेत. कोलकात्याकडून आंद्रे रसलनं सर्वाधिक 25 धावा केल्या आहेत. आरसीबीकडून वानिंदु हसरंगानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
