IPL 2022: क्रिकेटच्या 'या' नियमाचा फलंदाजाला होतोय मोठा फायदा; लवकर बदल करण्यात यावा, माजी क्रिकेटपटूची मागणी
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 67 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) आमने-सामने आले होते.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 67 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) आमने-सामने आले होते. या सामन्यात बंगळुरूच्या संघानं आठ विकेट्सनं विजय मिळवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यादरम्यान, आरसीबीकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला राशिद खाननं पहिल्याच चेंडूवर बीट केलं. राशिद खाननं टाकलेला हा चेंडू स्टंपला लागला. परंतु, बेल्स पडल्या नाहीत. ज्यामुळं त्याला नाबाद ठरवलं गेलं. क्रिकेटच्या या नियमांत बदल करण्यात यावं, अशी मागणी भारतीय माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी केली आहे. तसेच चेंडू स्टंपला लागला की, फलंदाजाला बाद घोषित केलं पाहिजे, असं मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केलं.
आकाश चोप्रा काय म्हणाला?
चेंडू स्टंपला लागला आणि बेल्स पडल्या नाहीत. पण लाईट जळाली की, फलंदाजाला बाद घोषित केलं पाहिजे. जिंग बेल्स वजनानं भारी असतात.जेव्हा लाकडी बेल्स आल्या होत्या, त्यावेळी चेंडू थोडा जरी स्टंपला लागला की त्या पडायच्या. कधी कधी वारा जास्त वाहायचा तेव्हाही या बेल्स खाली पडायच्या. त्यावेळी बेल्स ओल्या करून ठेवल्या जायच्या. आताच्या बेल्स चेंडू लागल्यानंतरही पडत नाहीत. कारण त्या प्रमाणापेक्षा जड आहेत. यामुळं चेंडू स्टंपला लागल्यानंतर लाईट जळाली की, फलंदाजाला बाद घोषित करण्यात यावं. या नियमांत बदल करण्यात यावं, असं मत आकाश चोप्रांनी व्यक्त केलं.
तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर मॅथ्यू वेड नाराज
या सामन्यात पहिल्या डावातही अल्ट्रा एजसोबत अशीच घटना घडली होती. मॅक्सवेलच्या चेंडूवर अंपायरने मॅथ्यू वेडला एलबीडब्ल्यू आऊट दिलं. त्यावेळी मॅथ्यू वेडनं डीआरएस घेतला. कारण त्याला माहिती होतं की चेंडू आधीच्या त्याच्या बॅटला लागला. त्यानंतर पॅडवर आदळला. परंतु अल्ट्रा एजमध्ये चेंडू त्याच्या बॅट किंबा ग्लोव्हज लागला नसल्याचं दिसलं. ज्यामुळं तिसऱ्या पंचानेही त्याला आऊट दिले. तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर वेडनं नाराजी व्यक्त केली. पॅव्हेलियनमध्ये पोहोचल्यावर त्यानं हेल्मेट भिंतीवर आदळले आणि बॅटही फेकली.
हे देखील वाचा-