एक्स्प्लोर

RCB vs DC Playing 11 : दिल्लीला पहिल्या विजयाची प्रतिक्षा, आरसीबीविरोधात हे 11 खेळाडू मैदानात; खेळपट्टी कशी असेल? जाणून घ्या

RCB vs DC Pitch Report : आयपीएल 2023 मध्ये आज आरसीबी (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals : आज बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 20 वा सामना पाहायला मिळणार आहे. 15 एप्रिलला रंगणाऱ्या  सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत आरसीबीच्या घरच्या मैदानावर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. कारण संघाचा आयपीएल 2023 मधील आतापर्यंतच्या सर्व सामन्यात पराभव झाला आहे. 

RCB vs DC, IPL 2023 Match 20 : आरसीबी आणि दिल्ली यांच्यात लढत

दिल्लीचा संघ यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी आरसीबी विरोधात मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. दिल्ली संघाने आयपीएल 2023 मध्ये अजून खातंही उघडलेलं नाही. दिल्ली संघाचा हा पाचवा सामना असेल. तर दुसरीकडे आरसीबी संघाचा हा चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात याआधी खेळलेल्या तीन सामन्यांपैकी बंगळुरुने एक सामना जिंकला असून दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल

आज दुपारी 3.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.

RCB vs DC IPL 2023 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

IPL 2023, RCB Playing 11 : बंगळुरु संभाव्य प्लेईंग 11

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेव्हिड विली, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, वैशाक कुमार 

IPL 2023, DC Playing 11 : दिल्ली संभाव्य प्लेईंग 11

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

RCB vs DC Preview : दिल्ली पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज, आरसीबी स्वप्न धुळीला मिळवणार? कुणाचं पारड जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget