राजस्थानची प्रथम फलंदाजी, लखनौच्या संघात एकापेक्षा एक धुरंधर, पाहा प्लेईंग 11
RR vs LSG Score Live IPL 2024: संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केएल राहुलचा लखनौ संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
IPL 2024 RR vs LSG Toss And Playing XI: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) टी-20 क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सामना होणार आहे. केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थान संघाने तीन विदेशी खेळाडूंना मैदानात उतरवलेय. त्यामध्ये जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट प्लेईंग 11 मध्ये खेळणार आहेत. तर लखनौच्या संघात क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, निकोलसन पूरन आणि नवीन उल हक मैदानात उतरणार आहेत.
नाणेफेकीनंतर काय म्हणाला संजू सॅमसन -
केएल राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर संजू सॅमसन म्हणाला की, फलंदाजीसाठी खेळपट्टी पोषक दिसत आहे, आम्ही प्रथम फलंदाजी करतो, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी तयार होतो. आमच्याकडे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत. जयपूरमध्ये परत आल्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण सकारात्मक असल्याचं दिसतेय. रियान पराग चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जॉस बटलर, हेटमॉयर आणि बोल्ट हे विदेशी खेळाडू असतील. पॉवेल इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरु शकतो.
🚨 Toss 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
Time for Match 4️⃣ of #TATAIPL 🙌@rajasthanroyals win the toss and elect to bat against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/MBxM7IvOM8#RRvLSG pic.twitter.com/fRNnp2L8hD
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
RR Impact Subs : Nandre Burger, Rovman Powell, Tanush Kotiam, Shubham Dube, Kuldeep Sen
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन):
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर
LSG Impact Subs: Deepak Hooda, Mayank Yadav, Amit Mishra, Prerak Mankad, K Gowtham
GAME SET 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
Folks, who are you backing today - #𝐑𝐑 or #𝐋𝐒𝐆 🤔#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/cKqiCwdDMa