Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
Rajasthan Royals vs Delhi Capitals: आज दिल्ली कॅपिटल्स (DC) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) भिडणार आहे.
Rajasthan Royals vs Delhi Capitals: आज दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (RR) सामना रंगणार आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने संघात दोन बदल केले आहेत. इशांत शर्माच्या जागी मुकेश कुमार आणि शाई होपच्या जागी वेगवाग गोलंदाज ॲनरिक नॉर्टजेला संघात स्थान देण्यात आले आहेत. तर राजस्थानने संघात कोणतेही बदल केलेले नाही.
याआधी आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये 27 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये दिल्लीनं 13 वेळा तर राजस्थान रॉयल्सनं 14 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे आज कोण विजय मिळवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Match 9.Delhi Capitals Won the Toss & elected to Field https://t.co/gSsTvJeK8v #TATAIPL #IPL2024 #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
राजस्थान रॉयल्सची Playing XI- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान
इम्पॅक्ट प्लेअर- रोविमन पोयल, नांद्रे बर्गेर, तनुष खतियान, शुभम दुबे, कुलदीप सेन
Rajathan Royals Playing XI- Yashasvi Jaiswal, Jos Buttler, Sanju Samson(w/c), Riyan Parag, Shimron Hetmyer, Dhruv Jurel, Ravichandran Ashwin, Trent Boult, Yuzvendra Chahal, Sandeep Sharma, Avesh Khan
दिल्ली कॅपिटल्सची Playing XI- डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर- अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.
Delhi Capitals Playing XI- David Warner, Mitchell Marsh, Ricky Bhui, Rishabh Pant(w/c), Tristan Stubbs, Axar Patel, Sumit Kumar, Kuldeep Yadav, Anrich Nortje, Khaleel Ahmed, Mukesh Kumar
खेळपट्टी कशी असेल?
सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने आले. त्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने 20 धावांनी विजय मिळवला होता. संजू सॅमसनने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळपट्टीबद्दल बोलायचे तर येथे फलंदाजी करणे सोपे आहे, फलंदाज मोठे फटके सहज मारतात. पण त्याचवेळी खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. राजस्थान रॉयल्सकडे रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल फिरकीपटू आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सकडे कुलदीप यादव आणि अक्षर पटेल असतील, त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात.
घरच्या मैदानाचा राजस्थान फायदा घेणार-
आयपीएल 2024 च्या शेवटच्या आठ सामन्यांवर नजर टाकली तर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघांनी विजयाची नोंद केली आहे. हे पाहता राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकेल असे म्हणता येईल. याआधी राजस्थानने लखनौला जयपूरमध्येच पराभूत केले होते. घरच्या मैदानावरील फायदा लक्षात घेता राजस्थानलाही दिल्लीविरुद्ध विजयाची शक्यता आहे.
राजस्थान सध्या दुसऱ्या स्थानावर-
राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमाकांवर आहे. राजस्थानचे 2 गुण आहेत. राजस्थानचा आजचा दिल्लीविरुद्ध दुसरा सामना असून पहिला सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला होता.
दिल्ली आठव्या क्रमांकावर-
दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत सध्या आठव्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीचा राजस्थानविरुद्ध दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून 4 विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत 2 गुण मिळवण्यासाठी दिल्ली प्रयत्न करताना दिसेल.
संबंधित बातम्या:
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video