ऑरेंज, पर्पल कॅप राजस्थानच्या खेळाडूंकडे, पण या यांच्याकडून तगडे आव्हान, कधीही करु शकतात ओव्हरटेक
IPL 2022 Marathi News : आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आतापर्यंत झालेल्या सामन्यात राजस्थानच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली.
IPL 2022 Orange and Purple Cap : आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आतापर्यंत झालेल्या सामन्यात राजस्थानच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली. फलंदाजी जोस बटलर तर गोलंदाजीत यजुवेंद्र चहलने करिश्मा दाखवलाय. 15 व्या हंगामाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑरेंजकॅपवर राजस्थानच्या बटलरने कब्जा केलाय. बटलरने आतापर्यंत तीन शतकेही लगावली आहे. यजुवेंद्र चहल विकेट घेण्यात आघाडीवर आहे, पर्पल कॅपवर चहलने कब्जा केलाय. पण या दोन खेळाडूंना काही खेळाडू आव्हान देत आहेत...
ऑरेंज कॅप 2022
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. बटलरने 11 सामन्यात 618 धावा चोपल्या आहेत. राजस्थानकडून या एका हंगामातील सर्वाधिक धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा कर्णधार राहुल आहे. राहुलने 451 धावा चोपल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सिखर धवन आहे. धवनने 381 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर आहे, त्याने आठ सामन्यात 356 धावा केल्यात. पाचव्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक आहे, त्याने 344 धावा केल्यात.
क्रमांक | फलंदाज | सामने | धावा | सरासरी | स्ट्राइक रेट |
1 | जोस बटलर | 11 | 618 | 61.80 | 152.21 |
2 | के.एल राहुल | 11 | 451 | 50.11 | 145.01 |
3 | शिखर धवन | 11 | 381 | 42.33 | 122.11 |
4 | डेविड वॉर्नर | 8 | 356 | 59.33 | 156.82 |
5 | क्विंटन डी कॉक | 11 | 344 | 31.27 | 138.70 |
पर्पल कॅप 2022 :
गोलंदाजीत राजस्थानचा यजुवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कगिसो रबाडा आहे, त्याने 10 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कोलकात्याचा कुलदीप यादव आहे, त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. 17 विकेटसह हैदराबादचा नटराजन चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा हसरंगा 16 विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
क्रमांक | गोलंदाज | सामना | विकेट | सरासरी | इकनॉमी रेट |
1 | युजवेंद्र चहल | 11 | 22 | 14.50 | 7.25 |
2 | कुलदीप यादव | 10 | 18 | 17.16 | 8.42 |
3 | कगिसो रबाडा | 10 | 18 | 8.72 | 17.94 |
4 | टी नटराजन | 9 | 17 | 17.82 | 8.65 |
5 | वानिंदु हसरंगा | 11 | 16 | 19.00 | 8.21 |
राहुलचा लखनौ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर -
लखनौने शनिवारी कोलकात्याचा 75 धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा विजय साजरा केला. त्यामुळे लखनौच्या नेटरनरेटमध्ये मोठी वाढ झाली. या विजयाच्या बळावर लखनौने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. लखनौचा संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघाचेही 16 गुण आहेत. पण लखनौचा नेटरनरेट चांगला असल्यामुळे त्यांनी पहिल्या स्थानावर कब्जा मिळवलाय. लखनौ आणि गुजरात संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही संघाचे स्थान जवळपास निश्चित झालेय. दुसरीकडे राजस्थान रॉयलने पंजाबचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर बढती मिळवली आहे. राजस्थान संघाचे 11 सामन्यात 14 गुण आहेत. तर आरसीबी 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि पंजाब या दोन संघाचा पराभव झाल्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे त्यांची संधी कमी झाली आहे. पंजाबचा संघ 11 सामन्यात 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकात्याचा संघ 11 सामन्यात 8 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे आव्हान अधिक खडतर झाले आहे. दुसरीकडे पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचण्याची अद्याप संधी आहे. पण त्यांना उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणारे चेन्नई आणि मुंबई संघ तळाशी आहेत. चेन्नई सहा गुणांसह नवव्या तर मुंबई चार गुणांसह दहाव्या क्रमांकवर आहे. मुंबईचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय.