IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणीत वाढ, कोट्यवधी देऊन खरेदी केलेला पृथ्वी शॉ यो यो टेस्टमध्ये फेल
IPL 2022 : 26 मार्चपासून आयपीएल सुरु होणार असून सध्या सर्व खेळाडू सराव करण्यात व्यस्त आहेत.
![IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणीत वाढ, कोट्यवधी देऊन खरेदी केलेला पृथ्वी शॉ यो यो टेस्टमध्ये फेल Prithvi Shaw Failed yo yo test Delhi capitals in trouble before ipl 2022 IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणीत वाढ, कोट्यवधी देऊन खरेदी केलेला पृथ्वी शॉ यो यो टेस्टमध्ये फेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/14/dc4b765777a782bab2ad10e77c8785e2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सुरु होणार असून सध्या खेळाडू सराव करत आहेत. दरम्यान खेळाडूंची फिटनेस टेस्ट अर्थात यो यो टेस्ट केली जात असून दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा यो यो टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्यामुळे आता 7.50 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलेला पृथ्वी आयपीएल खेळू न शकल्यास दिल्लीचे मोठे नुकसान होऊ शकते.
दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ वर यंदा मोठी जबाबदारी होती. कारण दिल्लीतून दिग्गज फलंदाज हार्दीक वेगळा झाला होता. पण अशातच पृथ्वी या महत्त्वाच्या टेस्टमध्ये फेल झाल्याने दिल्ली संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. पृथ्वी यो यो चाचणीत अपयशी ठरला असून यो यो चाचणीच्या सध्याचा मर्यादा 16.5 इतक्या आहेत. तर पृथ्वीचा स्कोर हा केवळ 15 होता. त्यामुळे तो पास झालेला नाही.
असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
शिलेदार – ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिच नॉकिया (6.5कोटी), डेव्हिड वॉर्नर (6.25 कोटी), मिचेल मार्श (6.5 कोटी), शार्दूल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी), अश्विन हेब्बर (20 लाख), सरफराझ खान (20 लाख), कमलेश नागरकोटी (1.10 कोटी), केएस भरत (2 कोटी), मनदीपसिंग (1.10 कोटी), खलिल अहमद (5.25 कोटी), चेतन साकरिया (4.20 कोटी), ललित यादव (65 लाख), रिपल पटेल (20 लाख), यश धुल (50 लाख), रोवमन पॉवेल (2.80 कोटी), प्रवीण दुबे (50 लाख)
हे ही वाचा-
IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
गुजरातच्या संघासाठी खूशखबर! हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट केली पास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)