RCB vs PBKS Playing 11 : विराट कोहली की शिखर धवन कोण ठरणार वरचढ? आरसीबीविरुद्ध पंजाबचे 'हे' 11 किंग्स मैदानात
Punjab Kings vs Royal Challengers Bangalore : आज आयपीएलच्या (IPL 2023) 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु (RCB) यांच्या रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
PBKS vs RCB Playing 11 : आयपीएल (IPL 2023) आज, 20 एप्रिलला दोन सामने खेळवले जाणार आहे. पहिल्या सामना शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन ((Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (Inderjit Singh Bindra Stadium) रंगणार आहे. पंजाबच्या घरच्या मैदानावर हा सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर यजमान पंजाब संघ आज मैदानात उतरणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पुन्हा विजयी मार्गाकडे कुच करण्याचा प्रयत्न करेल.
A touch of King Kohli's class to get you into the Match Day vibe! 👑🤌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #PBKSvRCB @imVkohli pic.twitter.com/FWbemtKNwV
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 20, 2023
Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन ((Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडियमची (Inderjit Singh Bindra Stadium) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.
There's a new 𝐁𝐢𝐠 𝐒𝐡𝐨𝐰 in Mohali! 💪 #SherSquad, taiyyar ho jao! The clash begins at 3:30 PM. 💥#PBKSvRCB #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL pic.twitter.com/ZVuTEjpi5y
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 20, 2023
RCB vs PBKS Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
RCB Probable Playing 11 : बंगळुरु संभाव्य प्लेईंग 11
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक
PBKS Probable Playing 11 : पंजाब संभाव्य प्लेईंग 11
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, मॅट शॉर्ट, हरप्रीत सिंग, सिकंदर रझा, सॅम कुरान, जितेश शर्मा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंह.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
RCB vs PBKS Match Preview : बंगळुरु की पंजाब कोण मारणार बाजी? हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...