एक्स्प्लोर

PBKS vs DC, IPL 2023 Live: पंजाब आणि द्लली यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

PBKS vs DC Live : पंजाबला प्लेऑफमध्ये एन्ट्री घ्यायची असेल तर सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया, या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल कसा असेल? 

LIVE

Key Events
PBKS vs DC, IPL 2023 Live: पंजाब आणि द्लली यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

IPL 2023, Match 64, PBKS vs DC: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये आजचा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. या सीझनमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या टप्प्यातील सामन्यात या दोन संघांमध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना झाला, ज्यात पाहुण्या पंजाब किंग्ज संघानं दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरात 31 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघ पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे, याचा अर्थ ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. 

आयपीएलच्या चालू हंगामात, दिल्ली कॅपिटल्स संघानं आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि यावेळी त्यांना फक्त 4 सामने जिंकता आले आणि 8 सामने गमावले. त्यांचे केवळ 8 गुण आहेत आणि ते पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जबद्दल बोलायचं तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघानं आतापर्यंत 12 सामन्यांत 6 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत, ते 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत पंजाब किंग्जला प्लेऑफसाठी अंतिम चारमध्ये आपला दावा ठोकण्याची संधी आहे. पण दिल्लीचा संघ त्यांना हरवू शकतो आणि त्यांना सोबत घेऊन बुडूही शकतो. दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. पण पंजाबला प्लेऑफमध्ये एन्ट्री घ्यायची असेल तर सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया, या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल कसा असेल? 

कसा असेल खेळपट्टीचा अहवाल? 

आज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत धर्मशालामध्ये एकही सामना खेळला गेला नाही. बर्फाच्छादित टेकड्यांनी वेढलेल्या या सुंदर क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं तर, इथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी नक्कीच सोयीस्कर असेल. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सीझनमध्ये आतापर्यंत इथे एकही सामना झालेला नाही, त्यामुळे येथील खेळपट्टीवर खेळण्यासाठी दोन्ही संघांची कसोटी लागणार एवढं मात्र नक्की. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संघांमधील स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी 

पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs DC Match Preview: दिल्ली अन् पंजाबमध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या, आकडेवारी

23:16 PM (IST)  •  17 May 2023

दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय

दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय

23:07 PM (IST)  •  17 May 2023

पंजाबला सातवा धक्का

हरप्रीत ब्रार धावबाद झालाय..

23:05 PM (IST)  •  17 May 2023

पंजाबला सहावा धक्का

सॅम करन बाद झालाय.. पंजाबला सहावा धक्का... 

22:53 PM (IST)  •  17 May 2023

पाचवा धक्का

पंजाबला पाचवा धक्का.. शाहरुख खान बाद

22:51 PM (IST)  •  17 May 2023

लियाम लिव्हिंगस्टोनचे दमदार अर्धशतक

लियाम लिव्हिंगस्टोनचे दमदार अर्धशतक

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 January 2025Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!Bajrang Sonawane Pune| संतोष अण्णांना टॉर्चर करू-करू मारलं, पुण्यात बजरंग सोनवणेंचं आक्रमक भाषणAnandache Paan : चिंबोऱ्यांच्या रुपकातून माणसांच्या कथा! बाळासाहेब लबडे यांची  'चिंबोरेयुद्ध' कादंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Embed widget