Daryl Mitchell : IPL 2023 लिलावातील अनसोल्ड खेळाडूचा पराक्रम, पाकिस्तान विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक
PAK vs NZ : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलनं (Daryl Mitchell) सलग दुसरं शतक ठोकलं. हा खेळाडू आयपीएल 2023 च्या लिलावात अनसोल्ड राहिला होता.
Daryl Mitchell Unsold IPL Auction : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अनसोल्ड (Unsold Players) राहिलेल्या एका खेळाडूनं पराक्रम गाजवला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) फलंदाज डॅरिल मिशेलनं (Daryl Mitchell) सलग दुसरं शतक ठोकलं. डॅरिल मिशेल आयपीएल 2023 च्या लिलावात अनसोल्ड राहिला होता. मात्र, या खेळाडूची कामगिरी पाहता आयपीएलमधील फ्रेंचायझी एका चांगल्या खेळाडूला मुकलं आहे, असं म्हणावं लागेल. सध्या आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे. यंदाच्या हंगामात अनेक स्टार क्रिकेटपटू फोल ठरले आहेत. अशा परिस्थितीत या अनसोल्ड खेळाडूच्या कामगिरीनं साऱ्यांना चकित केलं आहे.
IPL 2023 लिलावातील अनसोल्ड खेळाडूचा पराक्रम
भारतात आयपीएल 2023 चा फिवर पाहायला मिळत असताना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानच्या फखर झमानच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा दमदार फलंदाज डॅरिल मिचेलनंही पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलंच धुतलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिचेलने 119 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 129 धावा केल्या.
Another magnificent innings by Daryl Mitchell in Rawalpindi 👏https://t.co/NDMcWBfSkU | #PAKvNZ pic.twitter.com/cQeoLifvo6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 29, 2023
पाकिस्तान विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंजदाज डॅरिल मिशेलने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली. रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डॅरिल मिशेलने 129 धावांची शानदार खेळी केली. यावेळ त्यानं 119 चेंडूंत षटक ठोकलं. त्याने 8 चौकार आणि 3 षटकारही मारलं. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यातही डॅरिल मिशेलने शानदार शतकी खेळी केली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यातही मिचेलने 113 धावांची दमदार इनिंग खेळली. मिशेलच्या या दमदार खेळीनंतरही न्यूझीलंड संघाला सामना जिंकता आला नाही.
डॅरिल मिशेलची आयपीएलमधील कामगिरी
'किवीं'चा स्टार खेळाडू डॅरिल मिशेलने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केलं. हा त्याचा पहिला हंगाम होता. यावेळी मिशेल राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. राजस्थान संघानं त्याला 75 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. आयपीएल 2022 मध्ये मिशेलला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 33 धावांची खेळी केली. त्यानंतर आयपीएल 2023च्या मिनी ऑक्शनमध्ये राजस्थाननं मिशेलला रिलीज केलं. मात्र, एक कोटी रुपयांच्या मूळ किमतीला त्याला कोणत्याही संघानं खरेदी केलं नाही, त्यामुळे तो यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :