SuryaKumar Yadav : 'मी माझा कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी...' आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादव भावूक
SuryaKumar Yadav Emotional tweet: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर पडला आहे.
SuryaKumar Yadav Emotional tweet: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर पडला आहे. यंदाच्या हंगामात सातत्यानं सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनं चाहत्यांचं प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर लवकरच मैदानात परतणार असल्याचंही त्यानं म्हटलंय.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
नुकतंच सूर्यकुमार यादवनं एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यानं असं म्हटलं आहे की, "तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यानं आणि प्रार्थनेनं मी लवकरच मैदानात परतेन. मी माझा कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या बाजूनं चीअर करेन".
गुजरातविरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत
मुंबई इंडियन्सनं 6 मे रोजी गुजरात टायटन्सला 5 धावांनी पराभूत केलं होतं. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईच्या संघानं सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवलं होतं.
सूर्यकुमार यादवची कामगिरी
दरम्यान, गुजरातविरुद्ध गेल्या आठवड्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवनं मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात 43.29 च्या सरासरीनं 303 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या तीन सामन्यांना मुकावं लागलं होतं.
हे देखील वाचा-