(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या संघात तिलक वर्मा परतला, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2023 Eliminator, MI vs LSG: मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2023 Eliminator, MI vs LSG: मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेपॉक मैदानावर कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील लखनौ संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. करो या मरोच्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. मुंबई आणि लखनौ यांच्यातील विजेता संघ गुजरातसोबत क्वालिफायर 2 मध्ये अहमदाबाद येथे खेळणार आहे.
चेपॉकची खेळपट्टी दुसऱ्या डावात संथ होते.. त्यात दव पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रथम फंलदाजी करुन धावांचा डोंगर उभारण्याचा मुंबईचाल मानस असेल. लखनौच्या संघालाही प्रथम फलंदाजी करायची होती. कृणाल पांड्याने तसा आपला मानस बोलून दाखवला. मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. कुमार कार्तिकेय याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्याच्याजागी ह्रतिक शौकिन याला संधी दिली आहे. चेपॉकच्या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो. त्यामुळे दोन्ही संघात फिरकी गोलंदाजांचा भरणा आहे. मुंबईच्या संघात तिलक वर्मा परतलाय. तर नेहल वढेरा याला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आलेय.
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Mumbai Indians
1 रोहित शर्मा (कर्णधार), 2 इशान किशन (wk), 3 सूर्यकुमार यादव, 4 टीम डेविड, 5 तिलक वर्मा, 6 कॅमरुन ग्रीन, 7 ख्रिस जॉर्डन, 8 ह्रतिक शौकिन, 9 पीयूष चावला, 10 जेसन बेहरनड्रॉफ, 11 आकाश मधवाल
Substitutes : नेहल वढेरा, रमनदीप सिंह, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय, संदीप वॉरियर
Lucknow Super Giants
1 कृणाल पांड्या (capt), 2 प्रेरक मांकड, 3 मार्कस स्टॉयनिस , 4 निकोलस पूरन (विकेटकिपर), 5 आयुष बडोनी, 6 दीपक हुड्डा, 7 कृष्णप्पा गौतम, 8 नवीन उल हक, 9 रवि बिश्नोई, 10 मोसिन खान, 11 यश ठाकूर
Substitutes: कायल मायर्स, डॅनियल सॅम्स , युद्धवीर सिंह, अमित मिश्रा
MI vs LSG Head to Head : मुंबई आणि लखनौ, हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ एकूण तीन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड आहे. आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध लखनौ तिन्ही सामन्यांध्ये सुपर जायंट्सने 'पलटन'चा पराभव केला आहे.
एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांची आकडेवारी काय सांगते?
आयपीएलच्या इतिहासात एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांचा विक्रम खूपच खराब राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या 15 मोसमात, एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या संघाला एकदाच विजेतेपद पटकावता आलं आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 मध्ये एलिमिनेटर सामना जिंकून त्यानंतर विजेतेपद मिळवलं होतं.
आयपीएल 2016 मध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने एलिमिनेटरमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाताचा 22 धावांनी पराभव केला. यानंतर हैदराबादने क्वालिफायर 2 मध्ये गुजरात लायन्स विरुद्धचा सामना 4 गडी राखून जिंकला. त्यानंतर अंतिम फेरीत हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावलं मिळवला.