एक्स्प्लोर

मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ

रोहित शर्मा आणि नमन धीर यांच्या अर्धशतकानंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 196 धावांपर्यंत पोहचला.

IPL 2024 MI vs LSG : रोहित शर्मा आणि नमन धीर यांच्या अर्धशतकानंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 196 धावांपर्यंत पोहचला. लखनौचा शेवट गोड झाला. लखनौने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. पण मुंबई इंडियन्सचा शेवट खराब झाला. साखळी फेरीतील अखेरचा सामनाही त्यांना गमावावा लागला. मुंबईला 14 सामन्यात फक्त 4 विजय मिळवता आले. गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाला दहाव्या क्रमांकावर आहे.

मुंबईची आक्रमक सुरुवात - 

लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात शानदार झाली. रोहित शर्मा आणि डेवॉल्ड ब्रेविस यांनी आक्रमक सुरुवात केली. विशेष रोहित शर्माने लखनौची गोलंदाजी फोडली. रोहित आणि ब्रेविस यांनी 88 धावांची भागिदारी केली. ब्रेविस फक्त 23 धावा काढून बाद झाला. त्यानं 20 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. नवीन उल हकने ब्रेविसला तंबूत धाडत लखनौला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर मुंबईचा डाव ढासळला. दुसऱ्या बाजूला विकेट पडत गेल्या. अनुभवी सूर्यकुमार यादव याला खातेही उघडता आले नाी. कृणाल पांड्याने सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद केले. 

रोहित शर्माचं शानदार अर्धशतक -

रोहित शर्मा याने शानदार फलंदाजी केली. विश्वचषकाआधी रोहित शर्मा याने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित शर्माने 38 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने लखनौच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने प्रत्येकाचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्माने चौफेर फटकेबाजी केली. रवि बिश्नोई याने रोहित शर्माला बाद करत लखनौला सर्वात मोठं यश मिळवून दिले. रोहित शर्माने 38 चेंडूमध्ये तीन षटकार आणि दहा चौकारांच्या मदतीने 68 धावा चोपल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या आशा संपल्या. 

हार्दिक पांड्या फेल -

कर्णधार हार्दिक पांड्याला मोठी खेळी करता आली नाही. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या स्वस्तात तंबूत परतला. हार्दिक पांड्याने 13 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. नेहाल वढेरा याला मोठी खेळी करता आली नाही. वढेरा याला तीन चेंडूमध्ये फक्त एक धाव काढता आली. 

नमन धीर चमकला - 

इशान किशन आणि नमन धीर यांनी अखेरीस विस्फोटक फलंदाजी करत संघर्ष केला. पण मुंबईला विजय मिळवून देण्यात अपयश आले. ईशान किशन 14 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला. नमन धीर यानं शानदार फलंदाजी करत संघर्ष केला. नमन धीर याने 28 चेंडूत शानदार -- धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि 5 षटकार ठोकले. 

लखनौचा भेदक मारा - 

लखनौकडून रवि बिश्नोई सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 37 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. मोहसीन खान, नवीन उल हक आणि कृणाल पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मॅट हेनरी आणि अर्शद खान यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget