माझी शेवटची IPL हे तुम्ही ठरवलं, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीचे स्पष्ट संकेत
MS Dhoni on Last IPL : चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी धोनीचे यंदाची अखेरची स्पर्धा असल्याची चर्चा होतेय. एमएस धोनीने यावर आपल्या खास शैलीत उत्तर देत 2024 मध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
MS Dhoni on Last IPL : चेन्नईच्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची अफाट गर्दी होत आहे. धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याचे संकेत मिळाल्यामुळेच चाहत्यांनी प्रत्येक सामन्याला स्टेडिअमवर गर्दी करत आहेत. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी धोनीचे यंदाची अखेरची स्पर्धा असल्याची चर्चा होतेय. एमएस धोनीने यावर आपल्या खास शैलीत उत्तर देत 2024 मध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. इकाना स्टेडिअमवर चेन्नई आणि लखनौ यांच्यात सामना रंगला आहे. नाणेफेकीनंतर Danny Morrison यांनी धोनीला निवृत्तीबाबत विचारणा केली. तेव्हा धोनीने त्यांना आपल्याच शैलीत उत्तर देत शांत केले.
नामेफेकीनंतर धोनीला Danny Morrison याने विचारले की, आयपीएलचा अखेरचा हंगाम एन्जॉय करतोय का? यावेळी धोनीने हसत आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा असेल.. हे तुम्ही ठरवलेय.. मी नाही.. यावर Danny Morrison याने धोनी पुढच्यावर्षीही कमबॅक करेल असे म्हटले. त्यावर धोनीने हसत हसत मैदान सोडले.
धोनी आणि Danny Morrison यांच्यातील वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नईनेही हा व्हिडीओ पोस्ट करत धोनीच्या उत्तराचे कौतुक केलेय. धोनीने पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. धोनीला याआधीही निवृत्तीबाबत विचारले होते. त्यावेळीही धोनीने आपल्या खास शैलीत उत्तर देत सर्वांना शांत केले होते.
Magizchi 🫰🤩#LSGvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛pic.twitter.com/EEvCHOhPP5
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 3, 2023
चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात धोनीच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. देशातील प्रत्येक मैदान पिवळे झालेले दिसतेय. सामना मुंबई, कोलकाता अथवा बेंगलोर कुठेही असो.. धोनीच्या चाहते हजेरी लावत आहे. धोनीची अखेरची आयपीएल असल्याचे अनेकांना वाटतेय. धोनीने कोलकात्यात खेळताना तसे संकेतही दिले होते. पण आज धोनीने स्पष्टच सांगितले की, ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा नाही. पुढीलवर्षीही धोनी खेळण्याची शक्यता आहे.
Danny Morrison - how you're enjoying your last season (jokingly)?
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
MS Dhoni - you've decided that it's my last season, not me (laughs). pic.twitter.com/oJNnjEhK1x
MS Dhoni at his very best!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
"You've decided it's my last". 😂 pic.twitter.com/Tlkc3kMdbE
2019
— Johns. (@CricCrazyJohns) May 3, 2023
MS Dhoni : Hopefully, Yes.
2020
MS Dhoni : Definitely, Not.
2021
Dhoni : Still I haven't left behind.
2022
Dhoni: Definitely, it will be unfair not to say thanks to Chepauk crowd.
2023
Dhoni: You have decided it will be my last. pic.twitter.com/NMUEyOyBmn
आणखी वाचा :
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तेव्हा काय झाले बोलणं?