MS Dhoni : फाफ डु प्लेसिस अन् विराट कोहलीची मागणी पंचांनी धुडकावली पण धोनीच्या एका सिक्सनं पूर्ण, मॅच तिथंच फिरली?? Video
IPL : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्जवर 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. धोनीच्या एका सिक्सनं कोहली अन् डु प्लेसिसची मागणी पूर्ण झाली.
बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengalur) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील मॅच मध्ये पावसानं व्यत्यय आणला होता. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरुच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर तीन ओव्हर होताच पावसानं व्यत्यय आणला होता. बंगळुरुनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 विकेटवर 218 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना आरसीबीच्या गोलंदाजांना दवबिंदू पडत असल्यानं हवी तशी गोलंदाजी करता येत नव्हती.यामुळं आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस (Faf Du Pleissis)आणि विराट कोहली (Virat Kohli) पंचांकडे वारंवार बॉल बदलण्याची मागणी करत होते. पंचांनी दोघांची मागणी धुडकावली होती. मात्र, महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) ती मागणी पूर्ण केली. धोनीनं एका सिक्सनं ही मागणी पूर्ण केली.
काय घडलं?
फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीनं पंचांकडे दोन ते तीन वेळा बॉल बदलण्याची मागणी केली होती. पावसानंतर दवबिंदूचा इफेक्ट जाणवत असल्यानं गोलंदाजांच्या हातून बॉल निसटत होता. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं पंचांकडे दाद मागितली. पंचांनी बॉल बदलण्यास नकार दिला.
चेन्नई सुपर किंग्जला 20 व्या ओव्हरमध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी 17 धावांची गरज होती. महेंद्रसिंह धोनी स्ट्राइकवर होता. धोनीनं पहिल्याच बॉलवर षटकार मारला. धोनीनं मारलेला सिक्स एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या पॅव्हेलियनच्यावर गेला. त्यामुळं तो बॉल परत मिळणं अशक्य झालं होतं. यामुळं आरसीबीला बॉलिंगसाठी नवीन बॉल मिळाला.
पाहा व्हिडीओ :
Nail-biting overs like these 📈
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
Describe your final over emotions with an emoji 🔽
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/XYVYvXfton
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसची जी मागणी पंचांनी धुडकावली होती ती अखेर 20 व्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या सिक्समुळं पूर्ण झाली.
यश दयालच्या हाती नवीन बॉल आल्यानंतर पहिल्याच बॉलवर त्यानं स्लोअर वन टाकला आणि धोनी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न केला. धोनी त्या बॉलवर बाद झाला आणि आरसीबीला मोठा दिलासा मिळाला. यानंतर पुढील चार बॉलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला केवळ यश दयालनं 1 रन दिली आणि आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाला.
संबंधित बातम्या: