एक्स्प्लोर

Rohit Sharma: चार दिवसात चित्र पालटलं, अखेर रोहितनं सूत्रं हाती घेतली, हार्दिक पांड्याला दिल्या सूचना, हैदराबाद विरुद्ध काय घडलं?

Rohit Sharma:आयपीएलच्या 17 व्या पर्वात मुंबईची सुरुवात निराशाजनक झालीय. मुंबई इंडियन्सनं पहिले दोन सामने गमावले आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्मालाच अखेर सूत्र हाती घ्यावी लागल्याचं पाहायला मिळालं.

हैदराबाद : आयपीएल (IPL 2024)मध्ये काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आठवी मॅच पार पडली. मुंबई इंडियन्सला हैदराबाद विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या चांगलाच अंगलट आला. हैदराबादच्या फलदाजांनी मुंबईच्या बॉलिंगला फोडून काढलं. हैदराबादनं पहिल्या 11 ओव्हर्समध्ये 160 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. हैदराबादच्या फलदाजांच्या जोरदार फटकेबाजीमुळं अखेर हार्दिक पांड्याला रोहित शर्माची मदत घ्यावी लागली. 

चार दिवसांमध्ये चित्र पालटलं

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिली मॅच 24 मार्चला पार पडली होती. या मॅचमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व पहिल्यांदा करत होता. पहिल्याच मॅचमध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्माला फिल्डींगला कुठं उभं राहायचं याबाबतच्या सूचना देत होता. हार्दिक पांड्यानं  रोहित शर्माला डीपला बाऊंड्रीवर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं हार्दिक पांड्या ट्रोल झाला होता. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये घडलेल्या प्रसंगाच्या बरोबर उलटं चित्र हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. 

अखेर हार्दिकनं घेतली रोहित शर्माची मदत    

हार्दिक पांड्यानं हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.हैदराबादच्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं मुंबईच्या बॉलर्सची धुलाई केल्यानंतर हार्दिक पांड्याला अखेर रोहित शर्माची मदत घ्यावी लागली. रोहित शर्मानं हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्यासाठी मुंबईची फिल्डींग लावली. यावेळी रोहित शर्माच्या सूचनेप्रमाणं हार्दिक पांड्या डीप बाऊंड्रीवर फिल्डींगसाठी जाऊन उभा राहिला.   

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि क्लासेनचं वादळ

हैदराबादच्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मुंबईच्या बॉलिंगची धुलाई केली. ट्रेविस हेडनं 24 बॉलमध्ये 62 धावा केल्या. यामध्ये त्यानं 18 बॉलमध्ये 62 धावा केल्या. यानंतर लगेचच अभिषेक  शर्मानं 16 बॉलमध्ये 50 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 63 धावा केल्या. यानंतर हेन्रिच क्लासेननं 80 धावा केल्या. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि क्लासेनच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादनं 20 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 277 धावा केल्या होत्या. 

मुंबईचे प्रयत्न अपुरे पडले

सनरायजर्स हैदराबाद केलेल्या 277 धावांचा पाठलाग करताना मुंबईनं देखील आक्रमक सुरुवात केली होती. रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर , तिलक वर्मा, टीम डेविड  रोमारिओ शेफर्ड आणि हार्दिक पांड्या यांनी चौकार षटकरांची आतिषबाजी करत 277 धावांचं आव्हान पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईच्या संघाला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा तिलक वर्मानं केल्या. मुंबईला यंदाच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.

संबंधित बातम्या :

Hardik Pandya : हार्दिकच्या चुकांचा फटका, त्या निर्णयांची पोलखोल, मुंबईच्या दुसऱ्या पराभवानंतर पांड्या माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर

कॅप्टन असावा तर असा, खडूस बॉलिंग, सुपर कॅच आणि  जबरदस्त प्लॅनिंग, कमिन्सने टीमसाठी जे जे हवं ते ते केलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget