Tim David in IPL 2023 : मुंबई इंडियन्सला मिळाला नवा 'पोलार्ड'! नवा धडाकेबाज फिनिशर, सलग तीन षटकार ठोकत जिंकला सामना
Tim David in IPL 2023 : मुंबई इंडियन्सला नवा 'पोलार्ड' मिळाला अशी चाहत्यांची प्रतिक्रिया आहे. धडाकेबाज फिनिशर टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला.
IPL 2023 MI vs RR : आयपीएल 2023 मधील 42 व्या सामन्यात सुर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) अर्धशतक आणि टीम डेव्हिडच्या (Tim David) फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा सहा विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 212 धावांचे आव्हान मुंबईने तीन चेंडूत आणि सहा विकेट राखून यशस्वी पार केलं. यशस्वी जयस्वाल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. सुर्यकुमार यादव याने 55 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने अखेरीस 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला.
मुंबई इंडियन्सला मिळाला नवा 'पोलार्ड'
टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सला नवा 'पोलार्ड' मिळाला अशी चाहत्यांची प्रतिक्रिया आहे. धडाकेबाज फिनिशर टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला. पोलार्ड मुंबईसाठी फिनिशर होता, त्याप्रमाणेच आता टीम डेव्हिड मुंबई संघासाठी फिनिशरची जबाबदारी सांभाळताना दिसत आहे.
टीम डेव्हिडचे सलग तीन षटकार
सोळाव्या षटकात सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर मुंबईला शेवटच्या 4 षटकांत 57 धावांची गरज होती. सूर्यानंतर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने शानदार फलंदाजी करत मोठे फटके मारले. त्यानंतर मुंबईला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानच्या जेसन होल्डरने 3 फुल टॉस चेंडू टाकले, यावर डेव्हिडने सलग तिन्ही षटकार मारून संघाला तीन चेंडू राखून सहा विकेटने विजय मिळवून दिला.
आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना
आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना होता. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा 2008 पासून खेळवली जात आहे. या स्पर्धेने अनेक खेळाडूंना करियर बनवण्याची वेगळी संघी दिली आहे. आयपीएलमध्ये चमकलेल्या अनेक खेळाडूंना पुढे टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
TIM DAVID - THE HERO OF MI.
— Sexy Cricket Shots (@sexycricketshot) April 30, 2023
MI needed 17 in 6 balls - 6,6,6 to win it. 🔥 #MIvsRRpic.twitter.com/IlEJcIRFVI
मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात अनोखे विक्रम
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दुहेरी हेडरच्या दिवशी सर्व संघांनी 200 हून अधिक धावा केल्या. पहिला सामना पंजाब (201) आणि CSK (200) यांच्यात 30 एप्रिल रोजी झाला. आणि दुसरा सामना मुंबई (214) आणि राजस्थान (212) यांच्यात झाला. मुंबईने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवून आयपीएलमधील 1000 वा सामना अविस्मरणीय ठरवला आहे. वानखेडेवर 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुंबई संघाने यशस्वीरित्या केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच एका संघाला 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना यश मिळालं आहे.
मुंबईची खराब सुरुवात
राजस्थानने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांनी मुंबईचा डाव सावरला. पण दोघांनीही एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. ईशान किशन याने 28 धावांची खेळी केली. तर कॅमरुन ग्रीन याने याने 44 धावांचे योगदान दिले. या दोघांना आर. अश्विन याने तंबूत धाडले. ग्रीन याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले.
शेवटच्या षटकात मुंबईनं जिंकला सामना
सूर्यकुमार यादव याने मुंबईचा डाव सावरला. सुर्यकमार यादव याने झटपट धावा जमवल्या. सुर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. सुर्यकुमार यादव याने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. सुर्यकुमार यादव मुंबईला सहज विजय मिळून देईल असे वाटत होते.. पण बोल्टच्या गोलंदाजीवर संदीप शर्मा याने जबरदस्त झेल घेतला. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.