MI vs PBKS Match Preview : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या...
MI vs PBKS IPL 2023 Match 31 Prediction : आयपीएल 2023 च्या 30 व्या सामन्यात आज मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (Punjab Kings) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
![MI vs PBKS Match Preview : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या... MI vs PBKS match preview Mumbai Indians vs Punjab Kings ipl 2023 match 31 prediction 2023 ipl live marathi news MI vs PBKS Match Preview : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/22/7fe97366ad4da53c615c5fe3c72b762e1682129709659322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI vs PBKS Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 31 वा सामना आज, 22 एप्रिलला मुंबईच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे.
MI vs PBKS IPL 2023 : मुंबई की पंजाब कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 31 व्या सामन्यात शनिवारी, 22 एप्रिलला पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना सामना पंजाब किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तसेच पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवानंतर आज मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
MI vs PBKS Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. मुंबई इंडियन्स संघाने 29 पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Our icon, our home, his birthday - it’s going to a be legendary celebration tomorrow. 😍
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2023
उद्या भेटूया, Paltan. 💙#OneFamily #MIvPBKS #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @sachin_rt pic.twitter.com/K2HgCODp4e
MI vs PBKS IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (Punjab Kings) या दोन संघामध्ये 22 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
Kasa Kai, मुंबई? 👋
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 21, 2023
Sadde Shers have arrived! 🦁#JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL #PunjabKings pic.twitter.com/IfvaGEsOJa
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
GT vs LSG Match Preview : गुजरात विरुद्ध लखनौ लढत, कुणाचं पारड जड? हेड टू हेड आकडेवारी पाहा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)