IPL 2022, MI vs PBKS : गब्बरसह कर्णधार मयांकचं देखील दमदार अर्धशतक; मुंबईला विजयासाठी 199 धावांची गरज
IPL 2022, MI vs PBKS : मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील पहिला वहिला विजय मिळवण्यासाठी 20 ओव्हरमध्ये 199 धावा करण्याची गरज आहे.
IPL 2022, MI vs PBKS : पुण्यातील एमसीए मैदानात सुरु असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) यांच्यातील सामन्यात पंजाबचा डाव आटोपला आहे. कर्णधार मयांक आणि स्टार फलंदाज शिखरच्या अर्धशतकाने पंजाबने 198 धावांचा डोंगर उभा केला असून मुंबईला विजयासाठी 199 धावा करायच्या आहेत. सामन्यात मुंबईचे गोलंदाज खास कामगिरी न करु शकल्याने पंजाबने सुरुवातीपासून धमाकेदार फलंदाजी कायम ठेवली. अखेरच्या काही षटकात चांगली गोलंदाजी झाल्याने धावसंख्या 200 पार गेलेली नाही पण 199 हे देखील बलाढ्य लक्ष्य मुंबईला विजयासाठी पार करायचे आहे.
यंदाच्या स्पर्धेत मुंबईने सलग चार सामने आतापर्यंत गमावले आहेत. त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आला नसल्याने आजतरी ते विजयाचं खातं खोलतात का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात नाणेफेक देखील मुंबईने जिंकल्याने मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या. कारण यंदा देखील आयपीएलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणारा संघ सामना जिंकत असल्याचे दिसत आहे. पण यंदा काही प्रमाणात कमी पडलेली मुंबईची गोलंदाजी आजही दिसून आली ज्यामुळे पंजाबने तब्बल 198 धावा केल्या आहेत.
चांगली सुरुवात
नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजी घेतली. पण फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने याचा फायदा घेत कर्णधार मयांक आणि शिखरने धमाकेदार खेळी सुरु केली. दोघेही फटकेबाजी करत होते. मयांकने अधिक तुफान फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर 52 धावांवर तो बाद झाला. ज्यानंतर शिखरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बेअरस्टोने त्याला काहीशी साथ दिली, पण बेअरस्टो 12 धावा करुनच तंबूत परतला. त्यानंतर शिखरला खास कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 70 धावांवर झेलबाद झाला.
जितेश-शाहरुखचा फिनिंशीग टच
चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या काही षटकात पंजाबची फलंदाजी ढासळत होती. पण अखेरच्या काही षटकात जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी पुन्हा स्फोटक फलंदाजी दाखवली. जितेशने 15 चेंडूत 30 तर शाहरुखने 6 चेंडूत 15 धावा केल्या. ज्यामुळे पंजाबचा स्कोर 198 धावांपर्यंत पोहोचला. ज्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 199 धावांची गरज आहे. मुंबईकडून बेसिलने दोन तर बुमराह, उनाडकट, एम. आश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
- Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण
- IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
- Video: सामना पलटवत होता दिनेश कार्तिक, पण तितक्यात जाडेजाने घेतला अफलातून झेल, जड्डूचं सेलिब्रेशन पाहाच!