Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण
Hardik Padnya : सोमवारी झालेल्या सामन्यात हार्दिकने एका दमदार अर्धशतक ठोकत संघाचा स्कोर वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पण या अर्धशतकामागे एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.
![Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण ipl 2022 Hardik pandya man puts i will resign banner if he scores 50, sparks twitter meme reaction gt vs srh Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/0511d208c1367c0882747001fc92b5ea_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SRH vs GT : आयपीएलच्या 21 (IPL 2022) व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने गुजरात टायटन्सला (SRH vs GT) आठ विकेट्सनी मात दिली. पण सामन्यात दोन्ही कर्णधारांनी झळकावलेल्या संयमी अर्धशतकामुळे क्रिकेट रसिकांचे चांगले मनोरंजन झाले. दरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) अर्धशतकानंतर एक नवा किस्सा व्हायरल होत आहे. झालं असं की, मैदानात आलेल्या एका प्रेक्षकाने 'हार्दिकने आज अर्धशतक झळकावल्यास मी नोकरी सोडेन' असा पोस्टर तयार करुन हातात पकडला होता. कॅमेरामनने देखील हा पोस्टर टीपला असून आता हार्दिकने अर्धशतक झळकावल्यानंतर या प्रेक्षकाने खरचं नोकरी सोडली का?, आता याचं काय होणार? असे एक न अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले असून विविध मीम्स देखील व्हायरल होत आहेत.
हैदराबादचा तगडा विजय
केन विल्यमसनची कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी आणि निकोलस पूरन, मार्करमचा फिनिशिंग टचच्या बळावर हैदराबादने गुजरातचा आठ गड्यांनी पराभव केला. या विजयासह हैदराबाद संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला. चार गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने पाच चेंडू आणि आठ गडी राखून सहज पार केले. केन विल्यमसन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना संयमी अर्धशतक झळकावले.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
- CSK vs RCB : आज चेन्नईविरुद्धच्या सामन्याला आरसीबीचा दिग्गज खेळाडू मुकणार; कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11
- SRH vs GT : हैदराबादच्या नवाबांचा विजय, गुजरातचा पहिला पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)