IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
IPL 2022, SRH vs GT : सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने गुजरात संघाला आठ गड्यांनी मात देत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.
![IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच IPL 2022 Nicholas Pooran Listning and Singing Bollywood Song during srh team travelling IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/cffb289ef468e363074f420ef53f524d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SRH vs GT : सोमवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादने गुजरातला हंगामातील पहिला पराभव चाखायला लावला. त्यांनी स्पर्धेतील दुसरा विजय मिळवत संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलवला असून यामुळे सर्वच खेळाडू काल आनंदी दिसत होते. त्यामुळेच सामन्यानंतर संघाच्या बसमधून जाताना संघाचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) देखील गाणी गुणगुणत होता.
वेस्ट इंडिजचा खेळाडू असलेला निकोलस यावेळी बॉलीवुड गाणी ऐकताना दिसत होता. दरम्यान सनरायजर्स हैदराबादने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पूरन अतिफ अस्लमने गायलेलं 'तू जाने ना हे' गाणं ऐकताना दिसत आहे. तो या गाण्यात अगदी तल्लीन झाला असल्याचं दिसत आहे. निकोलस पूरन याआधी पंजाब संघाकडून खेळत असून यंदा सनरायजर्स हैदराबादने त्याला IPL मेगा ऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
हैदराबादचा तगडा विजय
केन विल्यमसनची कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी आणि निकोलस पूरन, मार्करमचा फिनिशिंग टचच्या बळावर हैदराबादने गुजरातचा आठ गड्यांनी पराभव केला. या विजयासह हैदराबाद संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला. चार गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने पाच चेंडू आणि आठ गडी राखून सहज पार केले. केन विल्यमसन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना संयमी अर्धशतक झळकावले.
महत्त्वाच्या इतर बातम्या
SRH vs GT : हैदराबादच्या नवाबांचा विजय, गुजरातचा पहिला पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)