'कोण मी?...' हार्दिकने रोहितला 2-3 वेळा त्याच्या जागेवरून हलवले; नंतर थेट सीमारेषेवर पाठवले, पाहा Video
Rohit Sharma Hardik Pandya: हार्दिक पंड्या अनेकवेळा रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसला.
Rohit Sharma Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने IPL 2024 चा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6 धावांनी गमावला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत संघाचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची निवड केली. चाहत्यांना हा निर्णय अजिबात पटलेला नसल्याचे अनेक दिवसांपासून समोर येत आहे. याचदरम्यान गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पंड्या अनेकवेळा रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसला. त्याने 30 यार्ड सर्कलमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माला थेट सीमारेषेवर पाठवले. मात्र हार्दिकने सांगितलेलं सुरुवातीला रोहितला समजले नाही. त्यामुळे मी जाऊ का?, असं रोहित हार्दिकला विचारताना दिसला. त्यानंतर समोरुन होकार मिळताच रोहित सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी पोहचला. इतक्यावरच पंड्या थांबला नाही. त्याने रोहितला इथून तिथून दोन-तीन वेळेस हटवले. चाहत्यांना मात्र हे अजिबात पटलेलं नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हार्दिकच्या या गोष्टीवरुन टीका करण्यास सुरुवात केली आहे.
🚨 BREAKING NEWS 🚨
— Anil MS Gautam (@realgautam13) March 25, 2024
No fans of #RohitSharma𓃵 will pass without liking this post#RCBvsPBKS #ImranKhan #BAPSA #chapri #JNUSUElection2024 #HardikPandya #Hitman pic.twitter.com/9edYXkFoIE
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह नाराज?, भर मैदानात बोलले
सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रोहित आणि जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्यावर रागावले असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि बुमराह हार्दिकवर एका गोष्टीवरून नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. षटकांच्या दरम्यान बुमराह हार्दिकशी काहीतरी चर्चा करत होता. या चर्चेत रोहितही सहभागी होतो आणि रोहित येताच पंड्या काहीतरी बोलून परत जाऊ लागला. निघताना रोहित हार्दिककडे बोट दाखवतो आणि काहीतरी बोलतो. रोहित, बुमराह आणि हार्दिकची ही चर्चा स्टंप माईकपासून दूर झाली. त्यामुळे गोष्टी ऐकू येत नव्हत्या. मात्र कोणत्यातरी गोष्टीवरुन रोहित आणि बुमराह हार्दिकवर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
काल झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यातील रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय बोलणं झालं? #MIvsGT pic.twitter.com/txbUSCulUJ
— ABP माझा (@abpmajhatv) March 25, 2024
गुजरातने जिंकला सामना
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 6 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 168/6 धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी 45 (39 चेंडू) सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकार होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकात 162/9 धावाच करता आल्या.
संबंधित बातम्या:
आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?
RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार