एक्स्प्लोर

आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?

MI Vs GT: IPL 2024: स्पेन्सर जॉन्सनने संघाचे 19 वे आणि महत्त्वाचे षटक स्पेन्सर जॉन्सनने टाकले.

MI Vs GT: IPL 2024: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला. गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. 6 धावांनी गुजरातने मुंबईवर विजय मिळवला. 

गुजरातच्या या विजयात गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. अखेरच्या 5 षटकांत त्यांनी अचूक टप्प्यावर मारा केला आणि मुंबईचा हातातील विजय खेचून आणला. गुजरातच्या या विजयानंतर वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनची (Spencer Johnson) चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. स्पेन्सर जॉन्सनने मुंबईविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. स्पेन्सर जॉन्सनने या सामन्यांत 2 षटक टाकले. यामधील पहिल्या षटकांत त्याची गोलंदाजी चांगली झाली नाही. स्पेन्सर जॉन्सनने आपल्या पहिल्या षटकांत 17 धावा दिल्या होत्या.

स्पेन्सर जॉन्सनने संघाचे 19 वे आणि महत्त्वाचे षटक स्पेन्सर जॉन्सनने टाकले. या षटकांत तिलक वर्माने पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला असला तरी दुसऱ्याच चेंडूवर तिलकने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्यानंतर त्याच षटकांतील 6 व्या चेंडूवर  गेराल्ड कोएत्जीला बाद केले. जॉन्सनच्या षटकांत 8 धावा देत दोन विकेट्स पटकावल्या. सामन्यानंतर स्पेन्सर जॉन्सनने कर्णधार शुभमन गिलचे देखील कौतुक केले.

स्पेन्सर जॉन्सन सामन्यानंतर म्हणाला की, घरच्या मैदानावर विजय मिळवणे हे खूप अविश्वसनीय आणि खास होते. मला नेहमीच भारतात खेळायचे होते आणि गर्दी आश्चर्यकारक होती. मैदानावर जाताना बसमध्ये शुभमनच्या शेजारी बसलो. तो मला शांत करत होता. एक तरुण कर्णधार म्हणून तो अविश्वसनीय आहे, असं कौतुक स्पेसर जॉन्सनने केलं. 19 वे षटक टाकण्याआधी आमचे प्रशिक्षक आशिष नेहराने मला शांत राहण्यास सांगितले. तु गेम जिंकणार आहेस, असं आशिष नेहरा यांनी मला सांगितल्याचं स्पेसर जॉन्सनने सामन्यानंतर सांगितले. आशिष नेहरा गुजरातच्या प्रत्येक सामन्यादरम्यान खेळाडूंना सूचना देत असतात. 

स्पेन्सर जॉन्सन कोण आहे?

28 वर्षीय स्पेन्सर जॉन्सनला गुजरात टायटन्सने 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. स्पेन्सर जॉन्सनची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. स्पेंसरला विकत घेण्यासाठी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. अखेरीस गुजरात टायटन्सने स्पेन्सरला खरेदी केले. स्पेन्सरने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी केवळ दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. स्पेन्सर जॉन्सन हा ॲडलेड, ऑस्ट्रेलियाचा आहे. स्पेन्सर जॉन्सनने बिग बॅश लीगमध्ये नियमितपणे चांगली कामगिरी केली. डावखुरा वेगवान गोलंदाज बीबीएलमध्ये ब्रिस्बेन हीटचे प्रतिनिधित्व करतो. जॉन्सनने T20 क्रिकेटमध्ये 20 डावांमध्ये 30.23 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या. त्याने अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
IND vs PAK : भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
TCS Layoffs : टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, IT कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नेमकं काय घडतंय?
टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, नेमकं काय घडतंय?
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
Embed widget