Rohit Sharma MI vs DC IPL 2025: मुंबई इंडियन्सचा 'मनातला' कॅप्टनच कामाला आला, मैदानाबाहेरुन सूत्रं हलवली, एका निर्णयाने संपूर्ण सामना फिरला, VIDEO
Rohit Sharma MI vs DC IPL 2025: मुंबईने 20 षटकांत 5 बाद 205 धावा उभारल्यानंतर दिल्लीला 19 षटकांत 193 धावांत गुंडाळले. तीन फलंदाजांना बाद करणारा कर्ण शर्मा सामनावीर ठरला.

Rohit Sharma MI vs DC IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात काल मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals vs Mumbai Indians) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने रोमांचक विजय मिळवताना दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या शानदार कामगिरीसह मुंबईने आपला दुसरा विजय नोंदवला. तसेच, दिल्लीचा हा यंदाच्या सत्रातील पहिला पराभवही ठरला. विशेष म्हणजे, पहिल्या डावात 200 हून अधिक धावा काढल्यानंतर अपराजित राहण्याची कामगिरी मुंबईने कायम राखली. मुंबईने 20 षटकांत 5 बाद 205 धावा उभारल्यानंतर दिल्लीला 19 षटकांत 193 धावांत गुंडाळले. तीन फलंदाजांना बाद करणारा कर्ण शर्मा सामनावीर ठरला.
रोहित शर्माने मैदानाबाहेरुन सूत्र हलवली, VIDEO:
दुसऱ्या डावात मुंबईकडून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फिरकीपटू कर्ण शर्मा (Karn Sharma) मैदानात आला होता. कर्ण शर्मा मैदानात आल्यानंतर रोहित शर्मा डग आऊटमध्ये बसला होता. मात्र डग आऊटमध्ये बसून देखील रोहित शर्मा सामन्याचे सूत्र हलवताना दिसला. रोहितने मुंबई संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेला 13 व्या षटकानंतर चेंडू बदलण्याचा सल्ला दिला. दोन्ही बाजूने फिरकीपटू गोलंदाजांना षटक टाकण्यास सांगितले. कर्णधार हार्दिक पांड्या आणि महेला जयावर्धनने रोहितचा सल्ला ऐकला.
रोहितच्या सल्ल्यानुसार, मुंबई इंडियन्सने एका बाजूने कर्ण शर्मा आणि दुसऱ्या बाजूने मिचेल सँटनरला गोलंदाजी देत नवीन चेंडूने आक्रमण केले. ज्याचा परिणाम पुढील 3 षटकांमध्ये दिसून आला. या काळात दोन्ही गोलंदाजांनी फक्त 19 धावा दिल्या. त्याच वेळी, कर्ण शर्माने दिल्लीच्या दोन मोठ्या फलंदाजांनाही बाद केले. यामध्ये स्फोटक ट्रिस्टन स्टब्स आणि फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलचा समावेश आहे. रोहितच्या एका निर्णयाने सामना फिरल्याने महेला जयावर्धने आणि इतर प्रशिक्षकांनी त्याचे कौतुक केले. तसेच त्याच्यासोबत आनंदही साजरा केला.
SHARMA 🤝 SHARMA
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
How good was #KarnSharma ’s game-changing spell, sending Stubbs and Rahul back to the dugout? 👌#IPLonJioStar 👉 #DCvMI | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/JygXhdZMzR
#MI's spinners 𝙩𝙪𝙧𝙣𝙚𝙙 the game on its head! 🙌
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
Here’s how the experts broke down their coaching staff's spot-on call to bring them in at just the right moment 🗣#IPLonJioStar 👉 #LSGvCSK | MON, 14th APR, 6:30 PM LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/POK9x6m9Qc
दिल्लीचा विजयरथ रोखला-
आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे, याआधी दिल्लीने सलग 4 विजय मिळवले होते. मात्र मुंबई इंडियन्सने पराभव करत दिल्लीचा विजयरथ रोखला आहे. दिल्लीचा विजयरथ रोखायचा या इराद्यानं मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी केली केली. रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्यानं 18 धावा केल्या. तर, रिकल्टन यानं 41 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवनं 40 धावा केल्या. तिलक वर्मानं सलग दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर आणि रोहित शर्मा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 200 धावांचा टप्पा ओलांडला. मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 205 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्मानं 59 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव, विपराज निगम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर मुकेश कुमारला 1 विकेट मिळाली.
𝘝𝘪𝘤𝘵𝘰𝘳𝘺 𝘵𝘢𝘴𝘵𝘦𝘴 𝘴𝘸𝘦𝘦𝘵𝘦𝘳 𝘸𝘩𝘦𝘯 𝘪𝘵’𝘴 𝘵𝘩𝘪𝘴 𝘤𝘭𝘰𝘴𝘦! 💙
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
3⃣ run-outs, high drama and #MI walk away with a thrilling win to break #DC's unbeaten run 👊
Scorecard ▶ https://t.co/sp4ar866UD#TATAIPL | #DCvMI | @mipaltan pic.twitter.com/q9wvt5yqoe





















