एक्स्प्लोर

Karun Nair Jasprit Bumrah MI vs DC IPL 2025: बुमराह करुण नायरला भिडला, हार्दिक पांड्याही आला; रोहित शर्माच्या Iconic रिअ‍ॅक्शनने धुमाकूळ, VIDEO

Karun Nair Jasprit Bumrah MI vs DC IPL 2025: बुमराहच्या षटकात करुण नायरने अर्धशतक पूर्ण केले. याचदरम्यान षटक संपल्यानंतर करुण नायर आणि बुमराहमध्ये वाद झाला.

Karun Nair Jasprit Bumrah MI vs DC IPL 2025: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals vs Mumbai Indians) 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण दिल्ली संघ फक्त 193 धावा करू शकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे, याआधी दिल्लीने सलग 4 विजय मिळवले होते. दुसरीकडे, जर मुंबईने हा सामना गमावला असता, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला असता. 19 व्या षटकात, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षकांनी विचित्र पद्धतीने धावबाद करण्याची हॅट्रीक साकारत सामना जिंकला. दरम्यान, मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यात करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले. 

बुमराह करुण नायरला भिडला, हार्दिक पांड्याही आला, VIDEO: (Karun Nair Jasprit Bumrah Video)

करुण नायरने 89 धावांची शानदार खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या षटाकात करुण नायरने 18 धावाही केल्या.  तसेच बुमराहच्या षटकात करुण नायरने अर्धशतक पूर्ण केले. याचदरम्यान षटक संपल्यानंतर करुण नायर आणि बुमराहमध्ये वाद झाला. दुसरी धाव घेण्यासाठी धावत असताना करुण नायर गोलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहला आदळला. यानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान तु ज्या ठिकाणाहून धावतोय, ती माझी जागा आहे (तो स्पेस गोलंदाचा आहे) असं जसप्रीत बुमराह करुण नायरला म्हणाला. यानंतर करुण नायरही बुमराहला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर करुण नायर हार्दिक पांड्याकडे गेला आणि त्याला काहीतरी समजावू लागला. यानंतर हार्दिकने करुण नायरचं ऐकून घेतलं. हे सर्व सुरु असताना रोहित शर्माही बघत होता. दोघांच्या वादावर रोहित शर्मा हसत-हसत काहीतरी बोलताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

करुण नायरने संधीचं सोनं केलं-

करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा खेळाडू, यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये 2018 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं विजेतेपद मिळवून दिलं. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. आजच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करुण नायरला खेळण्याची संधी मिळालीआणि त्यानं या संधीचं सोनं केलं. करुण नायरनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु केली. मुंबईचा आणि टीम इंडियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जोरदार धुलाई करत धावा काढल्या. करुण नायरनं बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारले. 

करुण नायरचे जुने ट्विट व्हायरल-

मुंबई विरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर करुण नायरचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये तो प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे..., असं म्हणाला होता. गेल्या काही महिन्यांत करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने करुण नायरला आयपीएलच्या लिलावात 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. 

संबंधित बातमी:

IPL 2025 Mumbai Indians: सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज; झहीर खानलाही टाकले मागे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Eknath Shinde Drugs: एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Embed widget