(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs RCB : रजत पाटीदारने नाबाद शतक ठोकत रचला इतिहास, प्लेऑफमध्ये मोडले विक्रम
IPL 2022 : शतकी खेळीसह पाटीदारने अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. पाटीदारने अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावले...
Rajat Patidar Century Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या आहेत. पाटीदारने आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात नाबाद 112 धावांची खेळी केली. या शतकी खेळीसह पाटीदारने अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलच्या नॉकआउट/प्लेऑफ सामन्यात शतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरलाय.. तर पहिला अनकॅप खेळडू होण्याचा मान मिळवलाय. दरम्यान, पाटीदारच्या आधी आयपीएलच्या आधी मनिष पांडे आणि देवदत्त पडिक्कल यांनी शतक झळकावण्याचा विक्रम केलाय. पण यांनी साखळी खेळीत शतक झळकावलेय.
रजत पाटीदारची शतकी खेळी -
एलिमेनटर सामन्यात रजत पाटीदारने वादळी खेळी करत शतक झळकावले.. पाटीदारने अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावले... एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.. पाटीदारने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला... प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला अनकॅप खेळाडू आहे. रजत पाटीदारने सात षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 54 चेंडूत 112 धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामातील पाटीदारचे सर्वात वेगवान शतक ठरलेय.
आयपीएल नॉकआउट/प्ले ऑफमध्ये शतकी खेळी -
122 सेहवाग पीबीकेएस विरुद्ध सीएसके 2014 (क्वालीफायर 2)
117* शेन वॉटसन सीएसके विरुद्ध एसआरएच 2018 (फायनल)
115* वृद्धीमान साहा पीबीकेएस विरुद्ध केकेआर 2014 (फायनल)
113 विजय सीएसके विरुद्ध डीसी 2012 (क्वालीफायर 2)
101*रजत पाटीदार आरसीबी बनाम एलएसजी 2022 (एलिमिनेटर)
आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात वेगवान शतक
49 चेंडू - रजत पाटीदार*
49 चेंडू - रिद्धिमान साह
50 चेंडू - वीरेंद्र सहवाग
51 चेंडू - मुरली विजय
51 चेंडू - शेन वॉटसन
आयपीएलमध्ये कोणत्या अनकॅप्ड खिळाडूची शतकी खेळी?
120* पॉल वाल्थाटी पीबीकेएस विरुद्ध सीएसके 2011
114* मनीष पांडे आरसीबी विरुद्ध डेक्कन 2009
101* देवदत्त पडिक्कल आरसीबी विरुद्ध आरआर 2021
101* रजत पाटीदार आरसीबी विरुद्ध एलएसजी 2022