(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय
LSG vs PBKS Match : शिखर धवनचा पंजाब आणि राहुलचा लखनौ संघ आज एकमेंकाशी दोन हात करणार..कोण मारणार बाजी ?
LIVE
Background
IPL 2023, Match 21, LSG vs PBKS : शनिवारी आयपीएलच्या मैदानावर दोन सामने रंगणार आहेत. दुपारी आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये चिन्नास्वामी स्टेडिअमवर लढत होणार आहे. तर संध्याकाळी साडेसात वाजता लखनौ आणि पंजाब यांच्यात सामना होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ आणि शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब यांच्यामध्ये काटें टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. राहुलच्या लखनौने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या पंजाब संघानो चार सामन्यात दोन जिंकले अन् दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत या दोन्ही संघातील सामना रंगतदार होऊ शकतो. खेळपट्टी, प्लेईंग 11, हेड टू हेड आणि हवामान कसे असेल.. याबाबत जाणून घेणार आहोत..
हेड टू हेड –
लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आतापर्यंत एक सामना झाला आहे. या सामन्यात लखनौने 20 धावांनी विजय मिळवला होता.
पिच रिपोर्ट –
लखनौ आणि पंजाब यांच्यातील सामना श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. इकानाची खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. अशात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हवामान कसे असेल –
वेदर डॉट कॉमच्या रिपोर्ट्सनुसार, शनिवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे... पाऊस पडण्याची शक्यता नाही. लखनौमध्ये पाऊस पडण्याची शक्यता फक्त एक टक्के वर्तवण्यात आली आहे.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब (PBKS) यांच्यात 15 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील संभावित प्लेइंग 11 कशी असेल? –
पंजाब किंग्स :
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरूख खान, सॅम करन, कगिसो रबाडा, हरप्रीत बरार, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह
लखनौ सुपर जायंट्स :
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक/ काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम/अमित मिश्रा, आवेश खान, जयदेव उनादकट, मार्क वुड आणि रवी बिश्नोई
दोन्ही संघाचे पूर्ण स्क्वॉड कसे आहे.. संघात कोण कोण? –
पंजाब किंग्स :
शिखर धवन (कर्णदार),भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंह, ऋषी धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस, बलतेज सिंह, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर , सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्वाथ कावेरप्पा, शिवम सिंह, मोहित राठे, शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट आणि प्रभसिमरन सिंह
लखनौ सुपर जायंट्स :
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मनन वोहरा, मयंक यादव, आवेश खान, यश ठाकुर, मार्कस स्टोइनिस, डॅनियल सॅम्स, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, करण शर्मा, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, के गौतम, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन, जयदेव उनादकट, रोमारियो शेफर्ड, अमित मिश्रा, नवीन-उल-हक आणि युद्धवीर चरक
LSG vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय
शाहरुख खानने मारला विजयी चौकर... पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय
पंजाबला पाचवा धक्का, कर्णधार सॅम करन बाद
पंजाबला पाचवा धक्का, कर्णधार सॅम करन बाद
पंजाबला मोठा धक्का, मॅथ्यू शॉर्ट बाद
पंजाबला मोठा धक्का, मॅथ्यू शॉर्ट बाद झाला आहे. पंजाबला तिसरा धक्का बसला आहे.
पंजाबला लागोपाठ दोन धक्का
प्रभसिमरन आणि अथर्व तायडे स्वस्ता माघारी परतले... दोघांनी मोठी खेळी करता आली नाही
लखनौची 159 धावांपर्यंत मजल
लखनौची 159 धावांपर्यंत मजल