![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
LSG vs KKR : आवेश खान-जेसन होल्डरचा भेदक मारा, कोलकात्याचा 75 धावांनी पराभव
IPL 2022 Marathi News : लखनौच्या गोलंदाजापुढे कोलकात्याची फलंदाजी कोलमडली. कोलकात्याचा संघ 20 षटके फलंदाजीही करु शकला नाही.
![LSG vs KKR : आवेश खान-जेसन होल्डरचा भेदक मारा, कोलकात्याचा 75 धावांनी पराभव LSG vs KKR lucknow beat kolkata by 75 runs IPL 2022 Marathi News LSG vs KKR : आवेश खान-जेसन होल्डरचा भेदक मारा, कोलकात्याचा 75 धावांनी पराभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/b0c2656e848a7c0f7bc028cac4cbe1ae_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders: डिकॉकच्या वादळी अर्धशताकानंतर आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर लखनौने कोलकात्याचा 75 धावांनी पराभव केलाय. 177 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. लखनौच्या गोलंदाजापुढे कोलकात्याची फलंदाजी कोलमडली. कोलकात्याचा संघ 20 षटके फलंदाजीही करु शकला नाही. कोलकात्याचे संघाने 14.3 षटकांत सर्वबाद 101 धावा केल्या.
लखनौने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. बाबा इंद्रजीत एकही धाव न काढता माघारी परतला. त्यानंतर अॅरॉन फिंच (14), कर्णधार श्रेयस अय्यर (6), नितीश राणा (2), रिंकू सिंह (6), अनुकुल रॉय (0), टीम साऊदी (0) आणि ह्रतेश राणा (2) धावा काढून बाद झाले. रसल आणि नारायणचा अपवाद वगळता कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रसेलने 19 चेंडूत 45 धावांची तर नारायणने 12 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. 8 फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. तीन फलंदाजला भोपळाही फोडता आला नाही.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ संघाने 176 धावा केल्या होत्या. डिकॉकने वादळी अर्धशतकी खेळी केली. तर दीपक हुड्डाने 42 दावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. अखेरच्या षटकात जेसन होल्डरने छोटोखानी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात डी कॉक आणि राहुलमधील ताळमेळ चुकल्याने राहुल एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला. पण डी कॉकने झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावलं. पण 50 धावा करुन तोही बाद झाला. त्यानंतर मात्र दीपक हुडाने 27 चेंडूत 41 धावांनी तुफान खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्यास मदत केली. कृणालने 25 धावांची मदत त्याला केली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये स्टॉयनिसने तुफान खेळी करत षटकारांचा पाऊस पाडला. शिवम मावीच्या 19 व्या षटकाततर 5 षटकार पडले. यावेळी स्टॉयनिसने 3 तर होल्डरने एक विकेट घेतली. षटकातील एका चेंडूवर स्टॉयनिस बादही झाला.
साऊदीची उत्कृष्ट ओव्हर
19 व्या षटकात 5 षटकार खाल्यानंतर केकेआर संघाची 20 वी ओव्हर कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यावेळी अनुभवी टीम साऊदीने उत्तम अशी ओव्हर टाकत केवळ 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार षटकामुळेच लखनौचा संघ 176 धावाच करु शकला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)