SRK : शाहरुखने स्वत: फोन करुन केकेआरमध्ये खेळण्याची दिली होती ऑफर, पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा दावा
पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर याने हा दावा केला असून, केकेआरचा मालक शाहरुख खान याने स्वत: केकेआरसोबत खेळण्यासाठी कॉन्ट्रॅक्टबाबत बोलणी केल्याचं त्यानं सांगितलं आहे.
![SRK : शाहरुखने स्वत: फोन करुन केकेआरमध्ये खेळण्याची दिली होती ऑफर, पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा दावा Kolkata Knight riders Owner Shahrukh khan contacted former pakistan all rounder yasir arafat in 2008 IPL SRK : शाहरुखने स्वत: फोन करुन केकेआरमध्ये खेळण्याची दिली होती ऑफर, पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/35c7eec4c2938a4a4151347061be01a6_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL : आयपीएल (IPL) या क्रिकेटच्या महाहंगामाचं यंदाचं 15 वं वर्ष आहे. 2008 साली आयपीएलला सुरुवात झाली होती. त्यावेळी जागतिक क्रिकटमधील सर्व टॉपचे खेळाडू यावेळी स्पर्धेत होते. पाकिस्तान क्रिकेटमधील देखील अनेक दिग्गज यावेळी स्पर्धेत होते. शोएब अख्तर हातर केकेआरचा स्टार खेळाडू होता. दरम्यान काही पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळू शकले नाही, पण पुढील वर्षी ते खेळतील अशी आशा होती. पण त्याच दरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. असाच एक खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर यासिर आराफात (Yasir Arafat). मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. दरम्यान याच दरम्यानची आठवण यासिर याने सांगितली आहे.
माजी पाकिस्तानी ऑलराउंडर यासिर आराफात याने सांगितलं की, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मालक शाहरुख खान याने स्वत:हून यासिरला संघात सामिल करण्याची मागणी केली होती. शाहरुखने कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) यासिरसाठी तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्टही तयार केलं होतं. दरम्यान हा किस्सा आहे आयपीएल 2009 सालचा. एका यूट्यूब चॅनलवर आराफात याने बोलताना हा किस्सा सांगितला. आयपीएलच्या पहिल्या हंगामात केवळ 11 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता.
'मला आधी वाटलं ही मस्करी आहे'
यासिर आराफातने याबाबत सांगताना तो म्हणाला, 'मी तेव्हा इंग्लंडमध्ये कँटसाठी काउंटी क्रिकेट खेळत होतो. तेव्हाच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ व्यवस्थापनाची टीम त्याठिकाणी आली होती. त्यांनी शाहरुख खान यांना तुम्ही केकेआरमध्ये खेळावं असं वाटतं असल्याचं त्यांनी सागंतिलं. दरम्यानन आधी मला ही मस्करी असल्याचं वाटलं पण नंतर शाहरुखने स्वत: मला फोन करुन केकेआरमध्ये खेळण्याबाबत सांगितलं.'
'दहशतवादी हल्ल्यामुळे खेळू शकलो नाही आयपीएल'
माजी पाकिस्तानी ऑलराउंडर यासिर याबाबत सांगताना पुढे म्हणाला,'या सर्वानंतर काही काळातच मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. ज्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यापासून बंदी घालण्यात आली. दरम्यान यासिर याने पाकिस्तानकडून 3 टेस्ट सामन्यांसह 11 वनडे आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. 2000 ते 2012 सालापर्यंत तो पाकिस्तान संघाचा हिस्सा होता.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)