KKR vs RR, IPL 2023 Live: कोलकाता आणि राजस्थान यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
KKR vs RR, IPL 2023 Live: संजू सॅमसनच्या नेतृत्वातील पिंक आर्मी आज कोलकात्याविरोधात दोन हात करणार आहे.
LIVE
Background
KKR vs RR, IPL 2023 Live : नाईट रायडर्स आणि पिंक आर्मी यांच्यामध्ये आज काटें की टक्कर होणार आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. त्यामुळे विजयाच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. दोन्ही संघाची जमेची बाजू फिरकी गोलंदाजी आहे. दोन्ही संघात दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे या लढतीत फिरकीचा सामना पाहायला मिळू शकतो. आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे प्लेऑफमधील आव्हान अधीक खडतर होणार आहे. त्यामुळे विजाच्या इराद्यानेच दोन्ही संघ मैदानात उतरतील.
पिंक आर्मी पराभवाचा चौकार टाळणार का ?
संजू सॅमसनच्या नेतृत्वातील पिंक आर्मी आज कोलकात्याविरोधात दोन हात करणार आहे. मागील तीन सामन्यात राजस्थानचा पराभव झाला होता. पराभवाची हॅटट्रिक झाल्यानंतर संजू विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी मैदानात उतरले. राजस्थानने यंदाच्या हंगामात दणक्यात सुरुवात केली होती.. पण उत्तरार्धाकडे आयपीएल झुकल्यानंतर राजस्थानच्या कामगिरी निराशाजनक झाली. मागील सामन्यात 214 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.. पण गोलंदाजांकडून कामगिरीत सातत्य दिसत नाही.
विजयाच्या लयीत केकेआर -
फिरकीमध्ये रंगतदार लढत -
राजस्थान आणि कोलकाता या संघाकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. राजस्थानमध्ये आर. अश्विन आणि युजवेंद्र चाहल ही जोडी आहे. या जोडीला एडम जप्मा आणि मुर्गन अश्विन साथ देतील. राजस्थान आज तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकात्याकडे वरुण चक्रवर्ती आणि सुयेश शर्मा भन्नाट फॉर्मात आहेत. त्यांच्या जोडीला सुनील नारायण आहे. त्यामुळे दोन्ही संघातील दर्जेदार फिरकी गोलंदाजांचा सामना होईल..
फलंदाजीतील योगदान काय ?
फलंदाजीत राजस्थानची स्थिती बळकट आहे. राजस्थानकडून जोस बटलर, संजू सॅमसन आणि यशस्वी जायस्वाल भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय तळाला ध्रुव जुरेल आणि शिमरोन हेटमायर धावांचा पाऊस पाडत आहेत. देवदत्त पडिक्कल आण जो रुट यासारखे मध्यक्रम फलंदाज आहेत. तर दुसरीकडे कोलकात्याची फलंदाजी आरआरआर... म्हणजेच राणा, रिंकू आणि रसेल या त्रिकुटावरच आहे. या तिघांचा अपवाद वगळता जेसन रॉय याने प्रभावी कामगिरी केली आहे. वेंकटेश अय्यर याच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. इतरांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजी कोलकात्यापुढील मोठे आव्हान आहे.
फिनिशिंग कशी आहे..
फिनिशिंगचा विचार केल्यास कोलकात्याचा संघ यामध्ये वरचढ दिसतोय. धावांचा पाठलाग करताना रिंकू आणि रसेल तगडे फिनिशर आहे. रिंकू याने दोन सामने एकहाती जिंकून दिले होते. मधल्याळळीत कर्णधार नीतीश राणा वेगाने धावा काढत आहे. दुसरीकडे राजस्थानची ताकद आघाडीची फळी आहे... शिमरोन हेटमायर याच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. त्यामुळे अनेकदा पराभवाचा सामना करावा लागलाय.
दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय ?
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप प्लेऑफचा एकही संघ मिळालेला नाही. गुजरात आणि चेन्नई संघ आघाडीवर आहेत. कोलकाता आणि राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाचे समान 10 गुण आहेत. नेटरनरेटमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकात्यापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरली. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.. तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल..
KKR vs RR Head to Head : कोलकाता विरुद्ध राजस्थान हेड टू हेड आकडेवारी
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 27 लढती झाल्या आहेत. आकडेवारी पाहिल्यास कोलकात्याचे पारडे जड असल्याचे दिसतेय. कोलकात्याने 27 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानला 12 सामन्यात विजय मिळवता आलाय. एक सामन्याचा कोणताही निकाल लागला नव्हता.. राजस्थानविरोधात कोलकात्याची सर्वोच्च धावसंख्या 210 इतकी आहे. तर निचांक्की धावसंख्या 125 इतकी आहे. राजस्थानची कोलकात्याविरोधात 217 धावसंख्या सर्वोच्च आहे तर 81 निचांकी धावसंख्या आहे.
Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी आहे?
आज राजस्थान (RR) आणि कोलकाता (KKR) यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन्स स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमवर मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं. कोलकात्याकडे वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि सुयेश शर्म असे तीन फिरकी गोलंदाज आहेत.
राजस्थानचा कोलकात्यावर सहज विजय
राजस्थानचा कोलकात्यावर सहज विजय
यशस्वी जायस्वालचे वादळ
यशस्वी जायस्वाल याने अवघ्या 13 चेंडूत झळकावले अर्धशतक
राजस्थानला पहिला धक्का
जोस बटलरच्या रुपाने राजस्थानला पहिला धक्का बसला.. बटलर शून्यावर बाद झाला
इतरांची कामगिरी कशी -
आघाडीची फळी फ्लॉप गेल्यानंतर मध्यक्रम आणि तळाची फलंदाजीही ढेपाळली. शार्दूल ठाकूर, अनुकूल रॉय आणि सुनील नारायण यांना मोठी खेळी करता आली नाही. शार्दूल ठाकूर याला अवघ्या एका धावेचे योगदान देता आले. ठाकूर यंदाच्या आयपीएलमध्ये लयीत दिसत नाही. आरसीबीविरोधात एक वादळी अर्धशतकानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. वेकंटेश अय्यरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या करता आली नाही. अनुकूल रॉय आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी सहा धावांचे योगदान दिले.
आरआरआर फ्लॉप
कोलकात्याचे आरआरआर आज फ्लॉप गेले. कर्णधार राणा याला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राणा याने 17 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. तर रसेल याने 10 चेंडूत 10 धावा केल्या... यामध्ये एक षटकार लगावला. रिंकू याला करिष्मा दाखवता आला नाही. रिंकू 16 धावांवर तंबूत परतला.. या खेळीत त्याने एक षटकार लगावला. कोलकात्याचे आरआरआर फ्लॉप गेल्यामुळे धावसंख्येला लगाम लागला..