IPL 2022: जोस बटलरचा तुफान फॉर्म इतर खेळाडूंसाठी ठरतोय घातक, आता मोडला विराट कोहलीचा 'हा' विक्रम
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals) यांच्यात खेळला जात आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात चाहत्यांना राजस्थानचा स्टार फलंदाज जोस बटलरकडून (Jos Buttler) मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या सामन्यात तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानं 25 चेंडूत 22 धावा केल्या. मात्र, तरीही त्यानं आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीचा विक्रम मोडला
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरला आज कोलकाताविरुद्ध सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही.या सामन्यात त्यानं 25 चेंडूचा सामना करत केवळ 22 धावा केल्या. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोस बटलर कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. सतत धावा काढण्यासाठी धडपड करत असताना टीम साऊथीनं त्याला बाद केलं. मात्र, या छोट्या खेळीनंतरही त्यानं विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.
जोस बटलरची दमदार कामगिरी
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या बटलरने या हंगामातील 10 सामन्यांमध्ये 588 धावा केल्या आहेत. त्यानंतर तो आयपीएलच्या पहिल्या दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीनं 2016 मध्ये आयपीएलच्या पहिल्या 10 सामन्यांमध्ये 568 धावा केल्या होत्या.
आयपीएल 2022 मध्ये जोस बटलरची कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये जोस बटलरनं आतापर्यंत 9 डावात 566 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याची सरासरी 70.75 इतकी आहे. तर स्ट्राइकरेट 155.07 इतका आहे. या हंगामात त्यानं 47 चौकार आणि 36 षटकार मारले आहेत. राजस्थान संघासाठी गेल्या 14 वर्षात एकाही फलंदाजाने इतक्या धावा करता आल्या नाहीत. याआधी राजस्थानसाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बटलरच्याच नावावर होता.
हे देखील वाचा-