KKR Vs RR: संजू सॅमसनची एकहाती झुंज, राजस्थानचं कोलकात्यासमोर 153 धावांचं लक्ष्य
Indian Premier League 2022: या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
Indian Premier League 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) सुरू आयपीएलच्या 47 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं कोलकाता नाईट रायडर्ससमोर (Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals) 153 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननं (Sanju Samson) एकहाती झुंज दिली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात टीम साऊथीनं देवदत्त पडिक्कलच्या रुपात राजस्थानच्या संघाला पहिला झटका दिला. दरम्यान, तुफान फॉर्ममध्ये असलेला जोस बटलर आजच्या सामन्यातही मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूत शिवम मावीनं त्याला बाद केलं. या सामन्यात जोस बटलरनं 25 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसननं एक बाजूनं संयमी खेळी दाखवत संघाचा डाव सावरला. त्यानं 49 चेंडूत 54 धावा केल्या. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजी काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. कोलकात्याकडून टीम साऊथीनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, उमेश यादव, अनुकूल रॉय आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
कोलकात्याचा संघ-
आरोन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, अंकुल रॉय, बाबा इंद्रजीत (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, हर्षीत राणा, टीम साऊथी.
राजस्थानचा संघ-
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
हे देखील वाचा-