IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं नाव बदललं, 'या' नावाने ओळखला जाणार संघ
पंजाबचा संघ मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या मालकीचा आहे. मात्र संघाला एकदादेखील आयपीएल जिंकता आलेलं नाही.
IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब अशा काही संघांपैकी एक आहे ज्याला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. परंतु 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये 'पंजाब किंग्ज' म्हणून ओळखली जाईल.
गेल्या मोसमात दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल संघांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा समावेश होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पंजाबचा संघ बर्याच काळापासून नाव बदलण्याचा विचार करत होता. आयपीएलचा सीजन सुरु होण्यापूर्वी हे करणे योग्य होईल. संघाचं नाव बदलण्याचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही.
IPL 2021: 292 खेळाडूंच्या नावे बोली लागणार, सचिनचा मुलगा अर्जुनला मिळणार इतके रुपये
पंजाबचा संघ मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या मालकीचा आहे. मात्र संघाला एकदादेखील आयपीएल जिंकता आलेलं नाही. संघ एका सीजनमध्ये उपविजेत होता आणि एकदा तिसऱ्या स्थानावर होता.
IPL मधील कमाईत महेंद्रसिंग धोनी अव्वल, 150 कोटींचा आकडा पार करणारा पहिला खेळाडू
लिलावाच्या आधी नाव बदलले
लिलावाच्या अगदी आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघाच्या नावात बदल केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. गेल्या मोसमानंतर पंजाब संघाने मॅक्सवेलसह अनेक बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम आहेत. पंजाब संघाने मात्र या मोसमात टॉप लीडरशीपमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नव्या सत्रात संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे राहतील. याशिवाय केएल राहुलच्या नेतृत्वात हा संघ नवीन मोसमात खेळेल.
IPL Auction 2021: आयपीएल लिलावात 'या' पाच खेळांडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली