IPL 2021: 292 खेळाडूंच्या नावे बोली लागणार, सचिनचा मुलगा अर्जुनला मिळणार इतके रुपये
या वेळच्या आयपीएल हंगामासाठीच्या (IPL Auction 2021) लिलावामध्ये आठ फ्रेंचायजींकडून बोली लावण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंची यादी तयार करण्यात आली असून त्यात 164 भारतीय खेळाडू तर 125 परदेशी खेळाडू तसेच असोसिएट देशांच्या तीन खेळाडूंना स्थान मिळालंय.
IPL 2021 Auction Players List: आयपीएलच्या या हंगामामध्ये ज्या खेळांडूंच्या नावे बोली लागणार आहे त्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या वर्षीच्या हंगामासाठी एकूण 292 खेळाडूंच्या नावे बोली लागणार आहे. यासाठी 1114 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी केली होती, पण आठ संघांच्या फ्रेंचायजींनी त्यातून 292 खेळांडूंची अंतिम निवड केली आहे.
स्पिनर हरभजन सिंग आणि केदार जाधव यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्वीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंना दोन कोटी रुपयांच्या किंमतीच्या बेस प्राइज गटात ठेवण्यात आलं आहे. आयपीएलचा लिलाव हा 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये होणार आहे.
या वर्षी आठ फ्रेंचायजींकडून 61 खेळाडूंसाठी बोली लावण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 292 खेळाडूंची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये 164 भारतीय खेळाडू तर 125 परदेशी खेळाडू तसेच असोसिएट देशांच्या तीन खेळाडूंना स्थान मिळालंय. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ सर्वाधिक म्हणजे 13 खेळाडू खरेदी करु शकतो तर हैदराबाद सनरायझर्स आठ खेळाडू खरेदी करु शकतो.
विराट कोहलीला मिळणार खास व्यक्तीची साथ, संघाच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष
किंग्स इलेव्हन पंजाब संघ सर्वाधिक म्हणजे 53 कोटी 10 लाख रुपयांसह या लिलावात सहभागी होईल तर हैदराबाद सनरायजर्स 10 कोटी 75 लाख रुपयांसह या लिलावात आपली बोली लावेल. चेन्नई सुपरकिंग्ज संघ 22 कोटी 70 लाखांसह या लिलावात उतरेल. ते सात खेळाडू करु शकतील.
चेन्नई सुपरकिंग्जने या वर्षी हरभजन आणि केदार जाधवला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला या यादीत 20 लाख रुपये किंमतीच्या यादीत, म्हणजे सर्वात कमी बेस प्राइज यादीत स्थान मिळालंय. त्या व्यतिरिक्त मॅक्सवेल आणि स्मिथ तसेच शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वुड या खेळाडूंना सर्वाधिक किंमतीच्या बेस प्राइज गटात स्थान मिळालंय.
दीड कोटी रुपयांच्या आधार मूल्याच्या वर्गात 12 खेळाडूंना स्थान मिळालं आहे. भारतीय फलंदाज हनुमा विहारी आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना एक कोटी रुपयांच्या तिसऱ्या वर्गात स्थान मिळालंय.आयपीएलच्या या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेला 18 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सुरुवात होणार आहे.
IPL मधील कमाईत महेंद्रसिंग धोनी अव्वल, 150 कोटींचा आकडा पार करणारा पहिला खेळाडू