GT vs RCB, IPL 2022: किंग कोहली फॉर्ममध्ये परतला, इतक्या डावानंतर आयपीएलमध्ये झळकावलं अर्धशतक
GT vs RCB, IPL 2022: गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलंय.
GT vs RCB, IPL 2022: गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलंय. आयपीएलचा यंदाचा हंगाम विराट कोहलीसाठी चांगला ठरला नाही. पण गुजरातविरुद्ध 45 चेंडूत अर्धशतक ठोकून त्यानं आपला फॉर्म परत मिळवला आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी कोहलीला या खेळीची गरज होती. या हंगामात विराट कोहली दोन वेळा गोल्डन डकचा शिकार ठरला. कोहलीची आयपीएल कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे की तो एका हंगामात दोनदा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
विराट कोहलीचं आयपीएलमधील 43 वं अर्धशतक
विराट कोहलीचं आयपीएलमधील हे 43 वं अर्धशतक आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीनं तब्बल 14 डावानंतर आयपीएलमधील अर्धशतक ठोकलं आहे. या लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिडनं वार्नरनं आयपीएलमध्ये 52 अर्धशतक केली आहेत. तर, शिखर धवनच्या नावावर 46 अर्धशतकांची नोंद आहे.
बंगळुरूचं गुजरातसमोर धावांचं लक्ष्य
गुजरातविरुद्ध सामन्यात बंगळुरूच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार दुसऱ्या विकेट्ससाठी 99 धावांची भागेदारी केली. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या खेळीच्या जोदावर बंगळुरूच्या संघानं गुजरातसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं.
आयपीएलच्या मागच्या हंगामानंतर विराट कोहलीनं आरसीबीच्या संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीच्या संघानं फाफ डू प्लेसिसवर बोली लावून त्याला संघात सामील केलं. तसेच आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदंही त्याच्याकडं सोपवलं. दरम्यान, कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराट कोहली वेगळ्या अंदाजात खेळताना दिसेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु, यंदाचा हंगाम त्याच्यासाठी अतिशय खराब ठरला आहे.
हे देखील वाचा-