IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याचं अनोख शतक
IPL 2022 Marathi News : यंदाच्या आयपीएलमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा आरसीबी दुसरा संघ ठरला आहे.
Hardik pandya 100th IPL match : गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरोधात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच मोठे यश संपादन केलेय. होय... हार्दिक पांड्याचा हा आयपीएलचा शंभरावा सामना आहे. पण शंभराव्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक गमावाला. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या आयपीएलमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा आरसीबी दुसरा संघ ठरला आहे. याआधी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने असाच धाडसी निर्णय घेतला होता. आतापर्यंत झालेल्या इतर सामन्यात प्रत्येकवेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 99 सामन्यात 30.19 च्या सरासरीने 1781 धावा जमवल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 450 पेक्षा जास्त होता. हार्दिक पांड्याने आतापर्यंत सात अर्धशतके ठोकली आहेत. गुजरातआधी हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाचा सदस्य होता. आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी मुंबईने हार्दिक पांड्याला रिटेन केले नव्हते. त्यानंतर गुजरात संघाने हार्दिकला ड्राफ्टमध्ये घेतले.
A special 💯 for #PapaPandya 💙#SeasonOfFirsts #GTvRCB #AavaDe pic.twitter.com/uB6NO8Ns0E
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 30, 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन:
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेट किपर) हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
हे देखील वाचा