Karun Nair MI vs DC IPL 2025: 1076 दिवसांनी संधी, दमदार खेळी, पण सामन्यानंतर निराश अन् हळहळ; पराभवानंतर करुण नायर म्हणाला....
Karun Nair MI vs DC IPL 2025: मुंबईविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करुण नायरला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं.

Karun Nair MI vs DC IPL 2025: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals vs Mumbai Indians) 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण दिल्ली संघ फक्त 193 धावा करू शकला. या सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या करुण नायरने (Karun Nair) सर्वांचं लक्ष वेधलं.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करुण नायरला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. करुण नायरनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु केली. करुण नायरने 40 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत करुण नायरने 12 चौकार आणि 5 षटकार टोलावले. करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा खेळाडू, यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये 2018 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं विजेतेपद मिळवून दिलं. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. तब्बल 1076 दिवसांनी करुण नायरने पुनरागमन केले आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध महत्वाची खेळी केली. मात्र त्याला संघाला विजयापर्यंत घेऊन जाता आले नाही. दिल्लीच्या पराभवानंतर करुण नायर खूप निराश झालेला दिसला.
Karun winning hearts and awards last night 🫶🏆 pic.twitter.com/QR0JecqkaY
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 14, 2025
पराभवानंतर करुण नायर काय म्हणाला?
आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळतो. त्यामुळे पराभवानंतर निराश व्हायला होतं आणि आपण कितीही धावा केल्या तरी, जर संघ जिंकला नाही तर त्याला काही अर्थ नाही. माझ्यासाठी संघाचा विजय खूप महत्त्वाचा होता आणि तो होऊ शकला नाही. पण हा एक धडा आहे आणि आपण पुढे जाऊ आणि मला आशा आहे की मी अशीच कामगिरी करत राहीन आणि आम्ही जिंकू, असं करुण नायर म्हणाला. माझ्या खेळीबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, कारण मी चांगला खेळलो, पण संघासाठी शेवटपर्यंत फलंदाजी करु शकलो नाही, त्यामुळे मी खूप निराश आहे, असं करुण नायरने सांगितले.
Karun Nair thrilled Delhi with a scintillating knock of 89(40) 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
🎥 🔽 WATCH | @DelhiCapitals | @karun126
प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे...-
करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा खेळाडू, यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये 2018 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं विजेतेपद मिळवून दिलं. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करुण नायरला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. करुण नायरनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु केली. मुंबईचा आणि टीम इंडियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जोरदार धुलाई करत धावा काढल्या. करुण नायरनं बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारले. मुंबई विरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर करुण नायरचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये तो प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे..., असं म्हणाला होता. गेल्या काही महिन्यांत करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने करुण नायरला आयपीएलच्या लिलावात 50 लाख रुपयांना खरेदी केले होते.





















