MS Dhoni : माही पुढच्या पर्वात खेळणार की निवृत्त होणार? आयपीएलकडून धोनीचा इमोशनल व्हिडीओ शेअर, चाहत्यांना टेन्शन
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास आरसीबी विरुद्धच्या प्रवासानंतर संपला. यानंतर धोनी पुढील आयपीएल खेळणार की नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय.
बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमध्ये चेन्नईचा (Chennai Super Kings) 27 धावांनी पराभव झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्जला 27 धावांनी पराभूत केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नईला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आरसीबीनं (Royal Challengers Bengaluru) सलग सहा विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार की आरसीबी विरुद्धची मॅच अखेरची ठरणार असे प्रश्न निर्माण झाला आहे. या चर्चा सुरु झालेल्या असतानाच आयपीएलच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हँडलवरुन धोनीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. त्यामुळनं नव्या चर्चांना सुरुवात झालीय. अनेकांनी एमएस धोनीनं पुढचं आयपीएल खेळावं, अशी अपेक्षा चाहत्यांकडून केली जातेय.
धोनीचा व्हिडीओ आयपीएलकडून शेअर
चेन्नई सुपर किंग्जनं 2023 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर तत्कालीन कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं तो आणखी एक आयपीएल खेळणर असल्याचं म्हटलं होतं. 2024 च्या आयपीएलच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्व ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आलं.आयपीएलच्या 17 व्या पर्वात महेंद्रसिंह धोनी शेवटचं आयपीएल खेळत असल्याचं अनेकांना वाटत होतं.
𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 💛
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
Vibe MSD 😇
A feeling that captured the emotions of millions across the nation 🥹#TATAIPL | #RCBvCSK | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/CyCD05qhKH
आयपीएलच्या अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवरुन महेंद्रसिंह धोनीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत महेंद्रसिंह धोनीचा आवाज ऐकायला मिळतो. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीचं चाहत्यांनी ज्या प्रकारे स्वागत केलं ते देखील दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओनंतर अनेकांना महेंद्रसिंह धोनीचं 2024 आयपीएल अखेरचं असल्याचं वाटतं.
महेंद्रसिंह धोनी 2023 च्या आयपीएलमध्ये काय म्हणालेला?
एमएस धोनीनं त्यावेळी म्हटलेलं की," परिस्थितीनुसार तुम्ही पाहत असाल तर माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची सर्वात योग्य वेळ आहे. मात्र, या वर्षी मी जिथं असेन, मला जितकं प्रेम आणि स्नेह मिळाला, त्यानुसार मला खूप खूप धन्यवाद म्हणनं सोपं आहे. मी परत येईन, आयपीएलचा कमीत कमी एक हंगाम खेळेन, माझ्याकडून हे एक गिफ्ट प्रमाणं असेल. ज्या प्रकारे चाहत्यांनी प्रेम आणि स्नेह दाखवलं त्यानुसार मला त्यांच्यासाठी काही तरी करण्याची गरज आहे. मला वाटत हा माझ्या करिअरचा अखेरचा टप्पा आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी काही वेळ डगआऊटमध्ये उभा राहिलो. मला वाटलं मला याचा आनंद घ्यायचा आहे." असं धोनीनं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
Faf Du Plessis : धोनी मैदानावर असेपर्यंत मॅच वाचवणं अवघड होतं.. फाफ डु प्लेसिसची कबुली, म्हणाला....