IPL Play-offs Schedule : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-1 अन् एलिमिनेटर कोणता संघ, कुणाशी भिडणार? मुंबईविरुद्ध कोण खेळणार? जाणून घ्या समीकरण
आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. आरसीबी, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.

IPL Play-offs Schedule 2025 : आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. आरसीबी, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. गुजरात टायटन्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 33 धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळे, पॉइंट्स टेबलच्या टॉप-2 मध्ये राहण्याच्या त्याच्या आशा कमी झाल्या आहेत.
गुजरात टायटन्सचा एक सामना बाकी...
गुजरात टायटन्स संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 सामने जिंकले आहेत आणि चार सामने गमावले आहेत. त्याचा 18 गुणांसह नेट रन रेट अधिक 0.602 आहे. त्याचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध बाकी आहे.
आरसीबी आणि पंजाब किंग्जची सरस कामगिरी...
आरसीबी संघाने चालू हंगामात एकूण 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 8 सामने जिंकले आहेत. 17 गुणांसह त्याचा नेट रन रेट अधिक 0.482 आहे. तो सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे दोन सामने बाकी आहेत, जे त्याला सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळायचे आहेत.
पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. 17 गुणांसह त्याचा नेट रन रेट अधिक 0.389 आहे. तो पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचे अजून दोन सामने बाकी आहेत, जे त्यांना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहेत.
आरसीबी आणि पंजाब किंग्जला टॉप-2 मध्ये पोहोचण्याची संधी...
जर आरसीबी आणि पंजाब किंग्जच्या संघांनी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर आरसीबी आणि पंजाब किंग्जचे संघ पॉइंट टेबलच्या टॉप-2 मध्ये पोहोचतील. कारण दोन सामने जिंकल्यानंतर दोन्ही संघांचे एकूण 21-21 गुण होतील आणि दोन्ही संघ क्वालिफायर-1 खेळू शकतील. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला सीएसकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकल्यानंतरही 20 गुण मिळू शकतात आणि ते पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून बाहेर पडू शकतात आणि त्यांचा सामना एलिमिनेटर मध्ये मुंबई इंडियन्सशी होईल.
क्वालिफायर-1 जिंकल्यानंतर थेट फायनलमध्ये एन्ट्री
आयपीएलमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये असणाचा एक चांगला फायदा आहे. ते क्वालिफायर-1 खेळतील आणि जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जाईल. पराभूत संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी अजून एक संधी मिळते, क्वालिफायर-2 खेळतो. अशा परिस्थितीत, बहुतेक संघांना पॉइंट्स टेबलच्या टॉप-2 मध्ये राहणे आवडते. जेणेकरून त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.
हे ही वाचा -





















